एक्स्प्लोर
महाड दुर्घटनेत दोन बहिणींसह कुटुंबातले चौघे बेपत्ता
मुंबई : सावित्रीच्या पात्रातल्या अपघाताच्या बातम्यांवरुन बैकर आणि बलेकर कुटुंबियांच्या नजरा हटत नाहीत. कारण बेपत्ता झालेल्या एसटीमध्ये या दोन कुटुंबातले चौघे प्रवास करत होते. दीपाली बलेकर आणि स्नेहल बैकर या दोन बहिणींसह सुनील बैकर, अनिस बलेकर आणि अविनाश मालप अजूनही बेपत्ता आहेत.
कार्य आटोपून परतणाऱ्या कुटुंबियांवर अनाहूत संकट आलं. आईला सोडण्यासाठी घरी गेलेल्या अविनाश मालपचाही शोध लागत नाही. हातात फोटो घेऊन सावित्रीच्या तीरावर हतबलपणे एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहणाऱ्या पोराचे डोळे वडिलांना शोधत आहेत.
मंगळवारी रात्री जयगड गाडीत बसलेले धोंडू कोकरेही बेपत्ता आहेत. बसचे ड्रायव्हर गोरक्ष सीताराम मुंडे यांची फक्त बॅग मिळाली आहे. पण त्यांचा शोध अजूनही लागलेला नाही. त्यामुळे नातेवाईकांचा रोष पुरेसा बोलका आहे.
राजापूर-बोरीवली या बसमध्ये विरारचे 55 वर्षीय मंगेश कातकर सुद्धा प्रवास करत होते. ते काल बोरीवलीला येण्यासाठी निघाले होते.
55 वर्षीय मंगेश कातकर यांच्या बेपत्ता होण्यानं कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
जयगड-मुंबई बसमधील बेपत्ता प्रवाशांची नावं –
- सुनील महादेव बैकर
- स्नेहा सुनील बैकर
- दिपाली कृष्णा बलेकर
- अनिस संतोष बलेकर
- प्रशांत प्रकाश माने
- धोंडू बाबाजी कोकरे
- अविनाश सखाराम मालप
- सुहानी सुहास बलेकर
- आतिफ मेनन चौगुले
- आवेद अल्ताफ चौगुले
- बाळकृष्ण बाब्या वरक
- जे. वाणे
- श्री. वाघू
- मंगेश कातकर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement