एक्स्प्लोर
Advertisement
माजी राज्यमंत्री मामा किंमतकर कालवश
आजारी असलेले माजी राज्यमंत्री मामा किंमतकर यांनी नागपुरात वयाच्या 85 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
नागपूर : मधुकर उर्फ मामा किंमतकर... विदर्भावर होणाऱ्या अन्यायाला आकड्यांचा अभ्यास देत वाचा फोडणारा आवाज आज सकाळी शांत झाला. काही दिवसांपासून आजारी असलेले माजी राज्यमंत्री मामा किंमतकर यांनी नागपुरात वयाच्या 85 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
1994 साली राज्यपालांच्या निर्देशाने महाराष्ट्रात तीन वैधानिक विकास महामंडळं स्थापन करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत किंमतकर हे तज्ञ सदस्य म्हणून सरकार कोणाचंही आलं तरी कार्यरत राहिले. बॅकलॉग म्हणजे नक्की काय, विदर्भाचा अनुशेष हा किती आणि कसा आहे, ह्याचे सर्वात अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजेच मामा किंमतकर होते.
मामा किंमतकर यांचा अल्पपरिचय
- मामा किंमतकर यांचा जन्म 1932 साली रामटेक येथे झाला.
- 1952 साली त्यांनी बीएपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.
- 1952 साली रामटेक येथे राष्ट्रवादी विचारांची शाळा सुरु केली, स्वतः शिक्षक म्हणून 3 वर्ष कार्यरत होते.
- 1955 साली मॉडेल मिल कामगारांच्या हितासाठी लढा देत ट्रेंड युनियन आंदोलनात आघाडी घेतली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement