एक्स्प्लोर

Love Jihad Cases in Maharashtra : महाराष्ट्रात लव जिहादची एक लाखांपेक्षा जास्त प्रकरणं : मंगल प्रभात लोढा

Love Jihad Cases in Maharashtra : महाराष्ट्रात एक लाखांपेक्षा जास्त लव्ह जिहादची प्रकरणं समोर आल्याने कुठे ना कुठे समाज व्यथित आहे. ज्यात पुन्हा श्रद्धा वालकर हत्याकांड घडू नये ही सरकारची जबाबदारी आहे, असं मंगल प्रभात लोढा विधानसभेत म्हणाले.

Love Jihad Cases in Maharashtra : "महाराष्ट्रात लव्ह जिहादची (Love Jihad) एक लाखांपेक्षा जास्त प्रकरणं समोर आली आहेत," असं राज्याचे महिला बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी बुधवारी (8 मार्च) विधानसभेत सांगितलं. "महाराष्ट्रात एक लाखांपेक्षा जास्त लव्ह जिहादची प्रकरणं समोर आल्याने कुठे ना कुठे समाज व्यथित आहे. लव्ह जिहाद आणि महिलांवरील अत्याचार यामुद्द्यांवर राज्यभरात मोठ्या संख्येने मोर्चे निघत आहेत. राज्यात पुन्हा श्रद्धा वालकर हत्याकांड घडू नये ही सरकारची जबाबदारी आहे," असं मंगल प्रभात लोढा म्हणाले. आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंगल प्रभात लोढा बोलत होते.

महाराष्ट्रात पुन्हा श्रद्धा वालकर हत्याकांड घडू नये ही सरकारची जबाबदारी : मंगल प्रभात लोढा

मंगल प्रभात लोढा म्हणाले की, "आपण महिला सुरक्षा, सक्षमीकरणाच्या गोष्टी करतो. पण लव्ह जिहाद तसंच महिलांवरील अत्याचार या मुद्द्यावर राज्यभरात मोठ्या संख्येने मोर्चे निघत आहेत. महाराष्ट्रात एक लाखांपेक्षा जास्त लव्ह जिहादची प्रकरणं समोर आल्याने कुठे ना कुठे समाज व्यथित आहे. इंटरफेथ मॅरिज कमिटीबाबत मी बोलू इच्छित नाही.आधी जीआर वाचा, तो वाचल्यानंतर तुम्ही बोलवाल तिथे मी येईन. जीआरमध्ये एकही शब्द असा नाही जो एखाद्याच्या धर्म किंवा वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करेल. पण महाराष्ट्रात पुन्हा श्रद्धा वालकर हत्याकांड घडू नये ही सरकारची जबाबदारी आहे. श्रद्धा वालकरचे 36 तुकडे केले. तिला मारणारा कोणी होता, मरणारी कोणी होती म्हणून तो मुद्दा बनत नाही. लग्नानंतर ज्या मुलीचा आपल्या कुटुंबियांसोबत संपर्क तुटला आहे, तो पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न महिला बालविकास विभाग करेल.

आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांची माहिती गोळा करण्यासाठी समिती स्थापन

आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांची माहिती गोळा करण्यासाठी एका समितीची स्थापना केल्याची घोषणा राज्य सरकारने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात केली होती. राज्याच्या महिला व बालविकास विभागाने 13 डिसेंबर रोजी जीआर जारी करुन म्हटलं की आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती (राज्य स्तर) प्रामुख्याने विवाहांच्या आकडेवारीनुसार डेटा तयार करेल.

जानेवारीपर्यंत 152 आंतरधर्मीय विवाहांची माहिती

जानेवारीपर्यंत राज्य सरकारच्या आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समितीला 152 आंतरधर्मीय विवाहांची माहिती मिळाली होती. समितीच्या सदस्यांच्या माध्यमातून 152 प्रकरणे समोर आली आहेत. "समितीचं नावं प्रसिद्ध झाल्यानंतर काही कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. बहुतांश प्रकरणांमधील सदस्यांनी सांगितलं की, त्यांचा त्यांच्या मुलांशी संवाद तुटला आहे. त्यांना संवाद पुन्हा प्रस्थापित करण्याची किंवा समुपदेशन घेण्याची आवश्यकता होती," असं मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं होतं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel vs Atul Save : अतुल सावे की इम्तियाज जलील? पूर्व संभाजीनगरमध्ये कुणाची हवा?Muddyach Bola  | परळीकरांची कुणाला साथ? धनुभाऊच्या बालेकिल्ल्यातून मुद्याचं बोला!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 08 November 2024Ajay Chaudhari Shivdi Vidhan Sabha | शिवडीसाठी दोन ठाकरे आमने-सामने! अजय चौधरी म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
Embed widget