एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राजपथावर संचलन गाजवण्यासाठी महाराष्ट्र सज्ज
नवी दिल्ली : राजपथावरचं प्रजासत्ताक दिनाचं संचलन गाजवण्यासाठी महाराष्ट्र पुन्हा सज्ज झाला आहे. एनसीसी पथक असेल किंवा सांस्कृतिक चित्ररथ सगळीकडे महाराष्ट्राच्या नावाचा दबदबा पाहायला मिळत आहे. यावेळी राजपथावरच्या संचलनासाठी महाराष्ट्रातल्या 23 एनसीसी कॅडेट्सची निवड झाली आहे.
रिपब्लिक डे अर्थात आरडी परेड ही अत्यंत मानाची समजली जाते. या परडेसाठी विद्यार्थी निवडण्याची प्रक्रिया सप्टेंबरपासूनच सुरु होते. देशभरातून 2 हजार 68 कॅडेट्स विविध टप्पे पार करत दिल्लीपर्यंत पोहचतात. त्यातही एक महिन्याच्या कॅम्पनंतर संचलनासाठी राजपथावर जायची संधी केवळ 144 जणांनाच मिळते.
यात महाराष्ट्रातल्या तब्बल 23 जणांची यावेळी निवड झाली आहे. देशभरातून आलेल्या विविध राज्यांच्या पथकातून शेवटी उत्तम कामगिरी करणाऱ्या पथकाला पंतप्रधान बॅनर हा मानाचा सन्मान दिला जातो. विशेष म्हणजे आत्तापर्यंत 25 पैकी 17 वेळा महाराष्ट्राने हा बहुमान पटकावला आहे. कर्नल एस गणपती हे यावेळी महाराष्ट्राच्या एनसीसी संघाचे प्रमुख आहेत.
2016 मध्ये रोटेशन पद्धतीनुसार महाराष्ट्राच्या पथकाला सहभागी होण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ देशाचं मन जिंकायला पुन्हा सज्ज झाला आहे. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच', या लोकमान्य टिळकांच्या सिंहगर्जनेला नुकतीच 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने यावेळी महाराष्ट्राच्या चित्ररथात लोकमान्यांच्या जीवनकार्याचा आढावा घेण्यात येणार आहे.
या चित्ररथात मंडाले तुरुंग, लोकमान्यांनी सुरु केलेल्या पहिल्या प्रिटींग प्रेसची प्रतिकृती दाखवण्यात येईल. शिवाय या चित्ररथासोबत महाराष्ट्राचा लेझीम डान्सही सादर करण्यात येणार आहे. 'पहिलं नमन' या गाण्यावरती हा परफॉर्मन्स सादर होईल.
दोन वर्षापूर्वी ज्यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी झाला होता, त्यावेळी या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला होता. याच चित्ररथाचे कलादिग्दर्शक चंद्रेशखर मोरे यांनीच यावेळचा चित्ररथ साकारला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement