Lokmangal Multistate : भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या चिरंजीवासह लोकमंगल मल्टीस्टेटच्या नऊ संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल
दूध भुकटी प्रकल्पासाठी पाच कोटी रुपयांचे अनुदान उचलल्या याप्रकरणी लोकमंगल मल्टीस्टेटच्या तत्कालीन नऊ संचालकाविरोधात सोलापूरच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव यांच्यासह लोकमंगल मल्टीस्टेटच्या नऊ संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रे सादर करून दूध भुकटी प्रकल्पासाठी पाच कोटी रुपयांचे अनुदान उचलल्या याप्रकरणी लोकमंगल मल्टीस्टेटच्या तत्कालीन नऊ संचालकाविरोधात सोलापूरच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
आमदार आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख ( खासदार संजय काकडे यांचे जावई) अक्कलकोटचे भाजपाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह अन्य सात जणांचा यात समावेश आहे. रामराजे राजेसाहेब पाटील, अविनाश लक्ष्मण महागावकर, प्रकाश वैजनाथ लातुरे, सचिन पंचप्पा, कल्याण शेट्टी, बशीर बादशहा शेख, मुरारी सारंग शिंदे, हरिभाऊ धनाजी चौगुले, भीमाशंकर सिद्राम नरस गोडे अशी त्या अन्य संचालकाचे नाव आहेत.
तत्कालीन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी पांडुरंग घाडगे यांनी 28 नोव्हेंबर 2018 या दिवशी पोलिसात फिर्याद दाखल केली होती. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. 2015 मध्ये लोकमंगल मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्यामार्फत शासनाकडे दूध भुकटी निर्मिती आणि विस्तारित दुग्ध व शाळेचा प्रस्ताव पाठवला होता. त्यासाठी लागणारे कागदपत्र बनावट तयार करण्यात आली होती त्यामुळे या प्रकल्पाला मंजुरी मिळू नये अशी तक्रार दुग्धविकास पशुसंवर्धन कार्यालयाकडे करण्यात आली होती. त्यानुसार चौकशी दरम्यान काही कागदपत्र बनावट आढळून आली आहेत.
संबंधित बातम्या :