एक्स्प्लोर

बोगस खतांचा पुरवठा केल्यामुळे सुभाष देशमुखांशी संबंधित लोकमंगल बायोटेकवर कारवाई, गुन्हा दाखल

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित लोकमंगल बायोटेकवर कृषी विभागाने कारवाई केली आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिश्रखतांचा पुरवठा केल्याबद्दल लोकमंगल बायोटेकचे मालक, संचालक, रसायनशास्त्रज्ञ आणि व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित लोकमंगल बायोटेकवर कृषी विभागाने कारवाई केली आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिश्रखतांचा पुरवठा केल्याबद्दल लोकमंगल बायोटेकचे मालक, संचालक, रसायनशास्त्रज्ञ आणि व्यवस्थापकांविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम 420 आणि 34 या कलमान्वये तसेच अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या तीन व सात कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठवाड्यात विकली जाणारी अनेक मिश्रखतं कृषी विभागाच्या रडारवर होती. परंतु आता गुन्हा दाखल झाल्यानंतर मराठवाड्यातील लाखो रुपयांची मिश्रखतं जप्त करण्यात आली आहेत. मराठवाड्यात विकले जाणारे 18:18:10, 20:20:0 व 10:20:20 ग्रेडच्या मिश्र खतांची कृषी खात्याकडून तपासणी करण्यात आली होती. या तपासणीनंतर लाखो रुपयांचे खत जप्त करण्यात आले. खत उत्पादन आणि विक्रीत गंभीर बाबी आढळल्यास गुन्हा दाखल करण्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी दिले. त्यानुसार लोकमंगल बायोटेक प्रा. लिमिटेड या कंपनीतील सहा नमुने अप्रमाणित निघाले. त्यामुळे औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. दरम्यान, लोकमंगल बायोटेक कंपनीच्या संचालक मंडळावर मी नाही. त्यामुळे या प्रकरणाचा आपल्याशी संबंध नसल्याचे सांगत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आपली जबाबदारी झटकली आहे. तर सुभाष देशमुख जरी थेट संचालक मंडळावर नसले तरी त्यांचे नातेवाईक किंवा सहकारीच लोकमंगलच्या संचलाकपदी आहेत. त्यामुळे सोलापुरातल्या लोकमंगलच्या सर्वच निर्मितींवर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
Bigg Boss OTT : 'बिग बॉस ओटीटी 3'मधून सलमान खान आऊट! जाणून घ्या नवा होस्ट ते स्पर्धकांबद्दल सर्वकाही
'बिग बॉस ओटीटी 3'मधून सलमान खान आऊट! जाणून घ्या नवा होस्ट ते स्पर्धकांबद्दल सर्वकाही
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
कामाची बातमी! सरकारी नोकर भरती, दरमहा 35000 कमावण्याची संधी; विनापरीक्षा होणार निवड
कामाची बातमी! सरकारी नोकर भरती, दरमहा 35000 कमावण्याची संधी; विनापरीक्षा होणार निवड
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Dilip Walse Patil : महायुतीचा उमेदवार विजयी होणार, दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला विश्वासUday Samant On Sanjay Raut : संजय राऊत यांच्याकडून गंभीर आरोप;शिवसेनेची प्रतिक्रिया काय?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 01 PM: 13 May 2024: ABP MajhaAmol Kolhe Shirur Lok Sabha :आचारसंहिता धाब्यावर बसवायची असेल तर, इतका बडगा कशासाठी?, कोल्हेंचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, कसा चेक कराल? जाणून घ्या
Bigg Boss OTT : 'बिग बॉस ओटीटी 3'मधून सलमान खान आऊट! जाणून घ्या नवा होस्ट ते स्पर्धकांबद्दल सर्वकाही
'बिग बॉस ओटीटी 3'मधून सलमान खान आऊट! जाणून घ्या नवा होस्ट ते स्पर्धकांबद्दल सर्वकाही
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
पुण्यात धक्कादायक प्रकार, काँग्रेस शहराध्यक्ष मतदान केद्रावर गेले; पण अगोदरच झालं बोगस मतदान
कामाची बातमी! सरकारी नोकर भरती, दरमहा 35000 कमावण्याची संधी; विनापरीक्षा होणार निवड
कामाची बातमी! सरकारी नोकर भरती, दरमहा 35000 कमावण्याची संधी; विनापरीक्षा होणार निवड
मुंबई पोलिसांना तिघांजवळ कोट्यवधीचं मेफेड्रोन सापडलं,राजस्थानची लिंक मिळताच छापा टाकला अन् 104  कोटींचा साठा जप्त
मुंबई पोलिसांना कोट्यवधीचं मेफेड्रोन सापडलं,राजस्थानची लिंक मिळताच छापा, 104 कोटींचा साठा जप्त
Ahmednagar Lok Sabha : अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
अहमदनगरमध्ये पैसे वाटल्याचा आरोप, सुजय विखेंचे निलेश लंके अन् रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले...
Heeramandi Actress : 30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
30-40 टेकनंतरही परफेक्ट सीन येत नव्हता; अभिनेत्रीने उचलला दारूचा ग्लास; मग असं काही झालं की डायरेक्टर बोलला लय भारी
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
निर्यातबंदी उठवून फायदा काय? 10 दिवस झाले तर कांद्याच्या दरात वाढ नाहीच, शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
Embed widget