एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Buldhana News: निवडणूक आयोगाकडे तक्रार केली म्हणून चक्क जीवे मारण्याची धमकी; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Lok Sabha Election : महाराष्ट्रात आयएएस (IAS) अधिकाऱ्याची नियुक्ती त्याच्या स्वतःच्याच जिल्ह्यात केल्या प्रकरणी तक्रार केली म्हणून आयएएस अधिकारी विशाल नरवाडे यांच्या समर्थक आणि नातेवाईकांनी अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Lok Sabha Election : देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आयएएस (IAS) अधिकाऱ्याची नियुक्ती त्याच्या स्वतःच्याच जिल्ह्यात केल्याने हा प्रकारे म्हणजे नियमांचा भंग असून या नियुक्तीमुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांवर याचा प्रभाव पडू शकतो. असे असतांना बुलढाणा (Buldhana) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असलेले आयएएस अधिकारी विशाल नरवाडे यांची सरकार ने त्याच्या स्वतःच्याच जिल्ह्यात नियुक्ती केली होती. त्यामुळे या विरोधात आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ऍड. सतीश रोठे यांनी आयएएस अधिकारी विशाल नरवाडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

मात्र, ही तक्रार केल्यामुळे नरवाडे यांच्या समर्थक आणि नातेवाईकांनी ऍड. सतीश रोठे यांच्या कार्यालयासमोर जाऊन त्यांना अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप रोठे यांनी केला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी ऍड. सतीश रोठे यांनी बुलढाणा पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत यातील चार संशयित इसमांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. 

सक्त नियम असूनही स्वतःच्याच जिल्ह्यात नियुक्ती

बुलढाणा जिल्ह्यातील धाड या गावचे रहिवासी असलेले आयएएस अधिकारी विशाल नरवाडे हे 2020 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मात्र एन निवडणुकीच्या काळात आयएएस विशाल नरवाडे यांची बदली बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली. खरंतर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कुठल्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला त्याच्या स्वतःच्या जिल्ह्यात निवडणूक काळात नियुक्ती देण्यात येत नसते. असा सक्त नियम असूनही विशाल नरवाडे यांची नियुक्ती निवडणुकीच्या तोंडावरच देण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटल होते. परिणामी विशाल नरवाडे यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय आजाद हिंद संघटनेचे अध्यक्ष ऍड. सतीश रोठे यांनी या केली होती. तसेच या संबंधी मुख्य निवडणूक आयुक्तांना लेखी तक्रार देखील केली होती. 

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

त्यानंतर या तक्रारीची दखल घेत दोनच दिवसात विशाल नरवाडे यांची धुळे येथे बदली करण्यात आली. विशाल नरवाडे हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असल्याने त्यांच्या समर्थकांनी आणि इतर नातेवाईकांनी ऍड सतीश रोठे यांचा विरोध करत त्यांच्या कार्यालयासमोर जाऊन त्यांना अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप ऍड. सतीश रोठे यांनी केला असून या प्रकरणी बुलढाणा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सध्या पोलीस करत आहे. मात्र या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Karad : अजित पवारांची यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना आदरांजलीABP Majha Headlines :  9 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSharad Pawar Pritisangam : प्रितीसंगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना शरद पवारांकडून अभिवादनTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 25 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Embed widget