(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded Lockdown | नांदेडमध्ये 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन, आजपासून काही अंशी शिथिलता
नांदेड जिल्ह्यामध्ये वाढते कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने 25 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत सुरू असणाऱ्या लॉकडाऊनमध्ये 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ केली आहे. म्हणजे नांदेड जिल्ह्यात 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.
सांगली : एकीकडे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. तर दुसरीकडे जिल्हा स्तरावर स्थानिक प्रशासनाकडून वेगवेगळ्या पद्धतीने निर्बंध लादले जात आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये वाढते कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने 25 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत सुरू असणाऱ्या लॉकडाऊनमध्ये 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ केली आहे. म्हणजे नांदेड जिल्ह्यात 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. मात्र, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे नांदेडमध्ये आजपासून शिथिलता देण्यात आली आहे.राज्य शासनाच्या नवीन निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बुधवारी संध्याकाळी हे आदेश जारी केले आहेत.
गेल्या आठवड्यात नांदेडमध्ये 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पावलं उचलण्यात आली. मात्र यामुळे नागरिकांची गैरसोय होती हे लक्षात घेऊन शिथिलता देण्यात आली आहे. परंतु यामध्ये नागरिकांना मास्कचा वापर, फिजिकल डिस्टनस चे पालन करणे बंधनकारक असणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
काय आहेत प्रशासनाचे नियम?
- रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव. उल्लंघन केल्यास प्रति व्यक्ती 1 हजार प्रमाणे दंड लागणार आहे
- सार्वजनिक ठिकाणे पूर्णतः बंद राहणार
- मास्क न वावरणाऱ्या व्यक्तीस 500 रुपये दंड
- सार्वजनिक थुकण्यास बंदी, थुंकल्यास 1 हजार रुपये दंड
- सर्व सिनेमागृह,मॉल, सभागृह,रेस्टॉरंट बंद राहणार
- खाजगी कार्यालये ,आस्थापना 50 टक्के क्षमतेने राहणार सुरू
- सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत जिल्हाभरातील सर्व आस्थापना राहणार सुरू
- कोणत्याही सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक,राजकीय कार्यक्रमांना तसेच सभा,मोर्चा,मिरवणुका,यात्राना बंदी कायम
- विवाह समारंभास 50 नागरिकांच्या उपस्थितीत परवानगी तर अंत्यसंस्कार 20 लोकांची मर्यादा
- गृह विलगिकरणास पुन्हा एकदा परवानगीचे निर्देश, रुग्णाच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का तर घराबाहेर लावावा लागणार कोरोना विलगिकरणाचा बोर्ड
- या नव्या आदेशामुळे 6 एप्रिलपासून केवळ रात्रीची संचारबंदी असणार आहे.