शाळकरी विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या मुख्याध्यापकाला जन्मठेप
बाभूळगाव तालुक्यातील नांदुरा येथे 2017 मध्ये ही घटना घडली होती. तब्बल तीन वर्षांनी या प्रकरणातील दोषी मुख्यध्यापकाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
यवतमाळ : शाळकरी विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या मुख्याध्यापकाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आली आहे. हा निकाल जिल्हा व सत्र यांनी दिला आहे. दरम्यान, बाभूळगाव तालुक्यातील नांदुरा येथे 2017 मध्ये ही घटना घडली होती. तब्बल तीन वर्षांनी या प्रकरणातील दोषी मुख्यध्यापकाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
बाभूळगाव तालुक्यातील नांदुरा येथील शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होता. 2017मध्ये पीडित विद्यार्थीनीने शाळेतून घरी आल्यानंतर गुप्तांग दुखत असल्याची तक्रार आईकडे केली. त्यावेळी आईने त्याकडे दुर्लक्षं केलं. परंतु, पीडित मुलगी दररोज तक्रा करू लागल्यानंतर आईने तिची विचारपूस केली. त्यावेळी दोषी मुख्याध्यापकाचं कृत्य उघड झालं. एवढचं नाहीतर त्याच शाळेत शिकणाऱ्या इतर विद्यार्थीनींसोबतही हाच प्रकार घडला होता. दुसऱ्याच दिवशी पीडित विद्यार्थीनीने आईसोबत बाभूळगाव पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तक्रार नोंदवून सदर घटनेच्या सखोल चौकशीला सुरुवात केली. शाळेतील सर्व पीडित विद्यार्थिनींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
सदर घटनेतील दोषी मुख्याध्यापक शाळेतील विद्यार्थिनींना काहीही काम सांगून त्याच्या कार्यालयात बोलवायचा. त्यानंतर त्यांच्यासोबत अश्लिल कृत्य करून त्यांचा लैंगिक छळ करायचा. एकदा नाहीतर अनेकदा त्याने शाळेतील विद्यार्थिंनींचा छळ केला होता.
दरम्यान, 2017मध्ये पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या नराधम आरोपीस परभणीच्या गंगाखेड जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. तीन वर्ष या आरोपीला जामिन न देता, त्याला थेट फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निकालामुळे तब्बल तीन वर्षांनी चिमुकलीला न्याय मिळाला आहे. अशातच देशभरात महिलांवरील अत्याचारांची प्रकरणं काही थांबायचं नावच घेत नाही. त्यामुळे महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणातील दोषींना कठोरातील कठोर शिक्षा करा, अशी मागणी देशभरातून होताना दिसत आहे. अशातच दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही अद्याप त्यांना फाशी झालेली नाही. तर काही दिवसांपूर्वी हिंगणघाटमधील शिक्षेकेवर पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आले. सदर घटनेत शिक्षिकेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी हिंगणघाटमधील पीडितेचे नातेवाईक करत होते.
संबंधित बातम्या :
परभणीतील पाच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करुन हत्या, नराधमास फाशी
माझा विशेष | हिंगणघाटच्या आरोपीचा हैदराबादप्रमाणे 'न्याय' व्हावा?
हिंगणघाट जळीतकांडातील आरोपीची आई म्हणते मी पीडितेला भेटायला जाणार, तर पत्नी म्हणते...