एक्स्प्लोर
रत्नागिरीमध्ये आंबा बागेत शिकारीसाठीच्या सापळ्यात बिबट्या अडकला
पावसजवळच्या कुर्धे गावात आंबा बागेतील वन्य जीवांच्या शिकारीसाठी लावलेल्या सापळ्यात बिबट्या अडकला होता. पण वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या तीन तासाच्या अथक प्रयत्ननानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आलं.
रत्नागिरी : पावसजवळच्या कुर्धे गावात आंबा बागेतील वन्य जीवांच्या शिकारीसाठी लावलेल्या सापळ्यात बिबट्या अडकला होता. पण वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या तीन तासाच्या अथक प्रयत्ननानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आलं.
वन्य जीवांच्या शिकारीसाठी रत्नागिरीतल्या कुर्धे गावातील आंबा बागेत तारेचा फास लावला होता. यात बिबट्याचा पाय अडकल्याने तो जिवाच्या आकांताने ओरडत होता.
बिबट्या अडकल्याची माहिती मिळताच, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याची सोडवणूक करणे, आणि पिंजऱ्यात जेरबंद करणे हे वनविभागासाठी मोठं आव्हान होतं. कारण बिबट्या सुटला तर थेट वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याची शक्यता होती.
पण हातात कोणतंही सुरक्षा साधन नसताना, केवळ काठ्यांच्या सहाय्याने जिगरबाज वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याचा पाय फासकीतून सोडवला. तब्बल तीन तास हा सगळा थरार सुरु होता.
दरम्यान, वन्य जीवांच्या शिकारीवर बंदी असताना गावात फासकी नेमकी लावली कोणी याचा शोध घेतला जातो आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement