एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोल्हापुरात अमित शाहांचा कलम 370 चा नारा, मोदींचंही कौतुक
एकाच देशात दोन कायदे असू शकत नाहीत, असे म्हणत गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापुरातही कलम 370 चा नारा दिला आहे.
कोल्हापूर : एकाच देशात दोन कायदे असू शकत नाहीत, असे म्हणत गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापुरातही कलम 370 चा नारा दिला आहे. त्यासोबतच उरी, पुलवामा हल्ला, बालाकोट, तिहेरी तलाक विरोधी कायदा, अशा अनेक मद्द्यांना हात घालत त्यांनी विरोधकांवर टीका केली. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शाह यांनी आज कोल्हापुरात सभा घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं.
शाह म्हणाले की, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम हटवण्यासाठी पंतप्रधानपदावर 56 इंचाची छाती असलेल्या व्यक्तीची गरज आहे. मोदींच्या रुपाने आपल्याला असा पंतप्रधान लाभला आहे. मोदींकडे कठोर निर्णय घेण्याचे साहस असल्याचेही शाह यांनी सांगितले.
शाह म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारायला हवे की, जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचे तुम्ही समर्थन करता का? आतापर्यंत अनेक सरकारं आली आणि गेली, अनेक पंतप्रधान आले आणि गेले, परंतु कोणीही कलम 370 हटवण्याची हिंमत कोणी केली नाही. परंतु 56 इंचांची छाती असणाऱ्या आपल्या पंतप्रधानांनी कलम 370 हटवून दाखवलं.
कोल्हापूरच्या सभेनंतर शाह कराडमध्ये सभा घेणार आहे. त्यानंतर शिरूरमध्ये त्यांचा रोड शो होईल. संध्याकाळी 6 वाजता औरंगाबादेतल्या लासूरमध्ये अमित शाहांची प्रचारसभा पार पडेल. आजपर्यंतच्या शाहांच्या सभेत नेहमी कलम 370 चा मुद्दा पाहायला मिळाला. तरी, आजच्या सभेत शाह मतदारांना काय साद घालतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement