एक्स्प्लोर
मनपाचे गाळे तारण ठेऊन कोट्यावधीच्या कर्जाची मंजूरी
लातूर/ सोलापूर: महानगरपालिकेने भाडेतत्वावर दिलेले गाळे तारण ठेवून कोट्यावधीची कर्ज उचलण्याचे प्रकार लातूरमध्ये उघड झाले आहेत. यात स्थानिकांबरोबरच मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगलचा ही समावेश असल्याने देशमुख यांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे या प्रकरणात कर्ज उचलणारे मनपा कर्मचारी आणि बँक कर्मचाऱ्याच्या संगनमताने हा सारा व्यवहार सुरु असल्याची माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी दिली.
वास्तविक, भाडेत्त्वावर दिलेल्या जागा तारण ठेवून कर्ज उचलता नाही. मात्र नियमांना पायदळी तुडवत लातुरमधील यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्समधील 15 गाळे माऊली ज्वेलर्सच्या संचालिका चंद्रकला व्यंकटराव पाटील यांनी तारण ठेवून जनता सहकारी बँक लिमिटेडकडून तब्बल पंधरा कोटीचे कर्ज घेतलं.
तर दुसरीकडे जुन्या नगरपरिषदेच्या जागेवर बांधलेल्या व्यापारी संकुलातही असाच प्रकार घडला आहे. या संकुलातील एक ते सहा क्रमांकाचे गाळे हे संजय बोरा यांनी भाडेतत्त्वावर घेतले. बोरा यांनी मनपाकडे या जागेवर तारण ठेवून तीन कोटीच्या कर्जासाठी ना हरकत प्रमाणपत्र मनपाकडे मागितले. यातील अजब प्रकार असा कि, मनपाने बोरा यांच्याकडून समंती पत्र घेऊन त्यांनाही ते देऊ केलंय. या सर्व प्रकाराबाबत मनपाच्या उप आयुक्तांना विचारले असता या संदर्भात माहिती घेऊ असे सांगितले. त्यामुळे हा मोठा आर्थिक घोटाळा असल्याचे बोलले जात आहे.
वास्तविक, मनपाची किंवा जिल्हा परिषदेची जागा गहाण ठेवण्याचा अधिकार आयुक्त किंवा सीओंना ही नाही. त्यासाठी या मनपा किंवा जिल्हा परिषदेसारख्या संस्थांना स्वत:साठी कर्ज प्रकरण करताना सरकारची परवानगी घ्यावी लागते. भाडेकरुसाठी ही सोया कायद्यातच नसताना अश्या स्वरूपाचे आर्थिक घोळ घालण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement