एक्स्प्लोर
रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर गानसम्राज्ञींना वाढदिवसाच्या शुभेच्छा
रत्नागिरी: रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वाळूशिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी लक्षवेधी वाळूशिल्प तयार करुन लतादीदींना शुभेच्छा दिल्या.
सध्या पटनाईक हे कोकण किनारपट्टीवर विविध ठिकाणी वाळूशिल्प साकारत आहेत. जे बघण्यासाठी लोक गर्दी करताहेत.
महाराष्ट्राच्या 23 समुद्र किनाऱ्यांवर सध्या निर्मल सागर तट अभियान राबवलं जातं आहे. या अभियानात पटनाईक वाळूशिल्पाच्या माध्यमातून किनारा स्वच्छतेचं महत्व पटवून देत आहेत.
पण आज लता मंगेशकर यांचा वाढदिवस असल्यानं खास वाळूशिल्प साकारून लता मंगेशकर यांना शुभेच्छा दिल्या. कोकणातील मालवण, रत्नागिरीनंतर आता गणपतीपुळेच्या समुद्र किनारी पटनाईक आपले महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील पुढील वाळूशिल्प साकारणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement