एक्स्प्लोर

अजित पवारांना मी शेवटचं भेटून समजवणार - जयंत पाटील

अजित पवार बंड केल्यापासून राष्ट्रवादीकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील आज पुन्हा अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत.

मुंबई : अजित पवार यांना मी शेवटचं भेटून समजवणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. महाविकासआघाडीने राज्यपालांकडे 162 आमदारांचं सह्या असणारं पत्रं राजभवनात दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधाला त्यावेळी पाटील बोलत होते. भाजप बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरल्यानंतर सत्तास्थापनेसाठी आम्हाला संधी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हेही उपस्थित होते. अजित पवारांनी बंड पुकारल्यानंतर त्यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादी गेल्या 2 दिवसांपासून प्रयत्न करत आहे. आजही राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, रामराजे निंबाळकर आणि दिलीप वळसे-पाटील हे अजित पवारांशी चर्चा करत आहे. विधीमंडळ गटनेते पदावरुन राष्ट्रवादीने अजित पवारांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. मात्र पक्षामधून काढून टाकलेले नाही. त्यामुळं अजूनही राष्ट्रवादीकडून अजित पवारांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर जंयत पाटील हेही अजित पवारांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. मी अजित पवारांना आज शेवटचं समजावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. महाविकासआघाडीच्या पत्रकार परिषदेत काय झालं? आज आम्ही विधानसभेतील 162 आमदारांच्या सह्या असणारं पत्र राज्यापलांना दिलं आहे. त्यामुळं भाजप असमर्थ ठरल्यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसंच घटकपक्षांना सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी, असं यावेळी जयंत पाटील यांनी सांगितलं. यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आम्ही वेळ वाढवून मागितली असतानाही आमची मागणी राज्यपालांनी फेटाळून लावली होती. लोकशाहीची पायमल्ली करण्यात आली, तसंच लोकशाहीचा गळा दाबण्याचा हा प्रकार असल्याची टीका केली. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली. अजित पवारांची मनधरणी करण्यात अपयश - शनिवारी सकाळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादीकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप यामध्ये राष्ट्रवादीला यश आलेलं नाही. शरद पवारांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अजित पवारांचे अनेक वर्षांचे विश्वासू सहकारी दिलीप वळसे पाटील यांना अजित पवारांची समजूत काढण्यासाठी पाठवलं होतं. मात्र दीड तासाच्या चर्चेनंतरही अजित पवारांची मनधरणी करण्यात पाटील यांना अपयश आलं. तत्पूर्वी रविवारी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनीही अजित पवारांची भेट घेतली. तटकरेंनी अजित पवारांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही त्यात अपयश आले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही अजित पवार यांना परतण्यासाठी भावनिक साद घातली आहे. याशिवाय आमदार रोहित पवार यांनीदेखील फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अजित पवार यांनी माघारी परतण्याचं आवाहन केलं आहे. संबंधित बातम्या - अजित पवारांकडं 27 आमदारांचं पाठबळ; बदल्यात 12 मंत्रिपदं अन् 15 महामंडळं? "पवारसाहेबांना राजकारणात हरवण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणजे सूर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार" अजित पवारांची भाजपसोबत जाण्यामागची 10 कारणं Sharad Pawar PC | अजित पवारांच्या बंडामागे माझा हात नाही, त्यांच्याशी बोलणं झालं नाही : शरद पवार | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
Embed widget