एक्स्प्लोर

अजित पवारांकडं 27 आमदारांचं पाठबळ; बदल्यात 12 मंत्रिपदं अन् 15 महामंडळं?

महाविकासआघाडीने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावर अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये काही महत्वांच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मुंबई : अजित पवार यांनी वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या महत्वाच्या मंत्र्यांची भेट घेतली. अजित पवारांकडं 27 आमदारांचा पाठींबा असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या बदल्यात अजित पवार यांच्या गटाला 12 मंत्रिपदं आणि 15 महामंडळं मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, वर्षा बंगल्यावर अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये काही महत्वांच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी भाजपला 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. दरम्यान, महाविकासआघाडीने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या (25 नोव्हेंबर)सुनावणी होणार आहे. त्यामुळं उद्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर खूप गोष्टी अवलंबून आहेत. वर्षावर काय चर्चा झाली? प्रथमतः सुप्रीम कोर्टाच्या तांत्रिक बाबींवर चर्चा होणार. या चर्चेत मुख्यमंत्री, वकील, भुओइंद्र यादव, गिरीश महाजन आणि विनोद तावडे उपस्थित असतील दुसरं म्हणजे अजित पवार गटाच्या पाठींब्याने जर भाजप बहुमत सिद्ध करू शकलं आणि सरकार स्थापना झाली तर अजित पवार गटाला 12 मंत्रिपदं आणि 15 महामंडळ दिले जाऊ शकतात अजित पवार यांची या सत्ता स्थापनेच्या वाट्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भुपेंद्र यादव यांच्यासोबत प्राथमिक चर्चा होणार आहे. यासाठी अजित पवार यांना 27 आमदार पाठींबा देण्याची शक्यता वर्तवली जातेय मात्र हा आकडा मिळवण्यासाठी भाजप आणि अजित पवारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे आजच्या बैठकीत अजित पवार यांचे विधिमंडळ गट नेते पद आणि व्हीपचा अधिकार कायम कसा ठेवता येईल याबाबत खलबतं होतील. याच मुद्द्यावर उद्याची सुप्रीम कोर्टातील सुनावणी आणि सत्ता समीकरण अवलंबून असेल ऑपरेशन लोटस आणि शिवतेज? भाजपने बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ऑपरेशन लोटस आणि ऑपरेशन शिवतेज सुरु केल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट अजित पवारांच्या पाठीशी असल्याचे बोलले जात आहे. अजित पवारांच्या शपथविधीला हजर असणाऱ्या आमदारांपैकी काही आमदार परतले आहेत. मात्र, अध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त पद्धतीने घेतली जाते. त्यामुळं कोणी कुणाला मतदान केले हे समजणार नाही. याचसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांचे मन वळवण्यासाठी भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवले जाणार आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांनी जरी भाजपशी युती तोडली असली तरी अजूनही शिवसेनेचे काही आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. हे आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपल्याला मतदान करतील, असा भाजपच्या नेत्यांना विश्वास आहे. यासाठी भाजप ऑपरेशन शिवतेज राबवणार असल्याची चर्चा आहे. संबंधित बातम्या - भाजपनं महाराष्ट्र आणि राजभवनाचा काळाबाजार केला : खासदार संजय राऊत "पवारसाहेबांना राजकारणात हरवण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणजे सूर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार" अजित पवारांची भाजपसोबत जाण्यामागची 10 कारणं Ajit Pawar | अजित पवार गटाला 12 मंत्रिपद मिळणार- सूत्र | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP MajhaABP Majha Headlines : 4 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget