मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर कारवाई, 26 लाख लोकांचा डेटा व्हेरिफाय कामाला सुरुवात
ladki bahin: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील तब्बल 26 लाख 34 हजार लाडक्या बहिणी विविध कारणांनी अपात्र ठरल्याचं जाहीर करण्यात आलं

Ladki Bahin Yojna: विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर घाईघाईने राबवलेली महाराष्ट्र सरकारची महत्त्वकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ' योजना सातत्याने चर्चेत राहिली. आधी सरसकट पात्र ठरवलेल्या महिलांना आता पडताळणी केल्यानंतर 14000 पुरुषांनीच या योजनेचा लाभ घेतल्याचा समोर आल्यानंतर आता पुढील 15 दिवसात लाडक्या बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत .
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,महिला आणि बालकल्याण खात्याकडून सुमारे 26 लाख लाभार्थ्यांची माहिती महिला व बालकल्याण विभागाकडे पाठवण्यात आली आहे .त्यानुसार या खात्यांची सखोल पडताळणी सुरू असून अनेक प्रकरणांमध्ये लाभार्थी महिलांच्या नावावर लाभ मंजूर झाला असला तरी बँक खाते मात्र पुरुषाचा असल्याचा दिसून आला आहे .
बोगस लाभार्थ्यांकडून लाभ रक्कम वसूल करण्याचा निर्णय
या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागाने बोगस लाभार्थ्यांकडून 11 महिन्यांचा संपूर्ण लाभ रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे .या निर्णयानुसार प्रत्येक बोगस खात्याकडून 16500 वसूल करण्यात येतील .इतकंच नव्हे तर याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात येणार आहे .मात्र ज्या महिलांनी त्यांच्या स्वतःच्या खात्याऐवजी इतर कुटुंबीयांचे खाते तात्पुरते जोडले आणि नंतर ते बदलले अशा लाभार्थींचा लाभ सुरू राहणार आहे .पण यात जर काही बोगस माहिती समोर आली त्यांच्याकडून 11 महिन्यांचे पूर्ण पैसे वसूल करण्यात येणार आहेत .
पुरुषांनी महिलांच्या नावावर घेतला योजनेचा लाभ
निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने राबवलेल्या महायुती सरकारच्या लाडकी बहिणी योजनेत सुरुवातीला सर्रास सरसकट महिलांना पात्र ठरवण्यात आलं . त्यांचा खात्यात थेट पैसेही जमा झाले .हे पैसे नक्की कोणाला मिळाले याची मोजतात खुद्द सरकारकडेही नव्हती .पात्र पात्र ठरवण्याचा सक्षम यंत्रणाही नसल्यामुळे या योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतला .विशेष म्हणजे पुरुषांनी महिलांच्या नावावर खोट्या कागदपत्रांच्या आधारे या योजनेचा लाभ घेतल्याचा समोर आलं .
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील तब्बल 26 लाख 34 हजार लाडक्या बहिणी विविध कारणांनी अपात्र ठरल्याचं जाहीर करण्यात आलं .यावेळी काही ठिकाणी पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केल्याचं निदर्शनास आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .लाडकी बहीण योजनेत तब्बल 4800 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला .हा सॉफ्टवेअर पासून झालेला घोटाळा असल्याचं त्यांचा आरोप होता .दरम्यान लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत .

























