एक्स्प्लोर
खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीही नव्हता, तरीही जिंकलो : निकम
मनुष्य खोटं बोलू शकतो, परिस्थिती खोटं बोलू शकत नाही, याचा प्रत्यय खटल्यात आला.
अहमदनगर : राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी, तीनही आरोपींवर दोष निश्चित करण्यात आले आहेत. मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्येचा दोष सिद्ध झाला आहे.
आता येत्या 22 तारखेला शिक्षेची सुनावणी होणार आहे. त्यामुळे या तीनही नराधमांना फाशी की जन्मठेप याचा फैसला आता 22 नोव्हेंबरला होणार आहे. त्याआधी 21 नोव्हेंबरला दोन्ही पक्षाचे वकील शिक्षेवर युक्तीवाद करतील. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कठोरातील कठोर शिक्षेची मागणी केली आहे. तर आरोपींच्या वकिलांचा त्यांच्या अशिलांना कमीत कमी शिक्षेची मागणी करतील. 8 कलमांखाली आरोपी दोषी न्यायालयाच्या निकालानंतर माध्यमांशी बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, "एकूण 8 विविध कलमांखाली न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवलं आहे. मुलीची हत्या, बलात्कार करुन हत्येचा कट रचणं, बलात्कार आणि खून करण्यासाठी प्रोत्साहित करणं, छेडछाड करणं असे आयपीसीच्या कलमांखाली न्यायालयाने दोषी ठरवंल आहे. त्याचप्रमाणे बाललैंगिक अत्याचाराच्या विविध तीन कलमांतर्गत तिन्ही आरोपींना दोषी ठरवलं आहे." आरोपीच्या कपड्यांवर मुलीच्या रक्ताचे नमुने उज्ज्व निकम यांनी सांगितलं की, "खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोणीही नव्हता. हा खटला संपूर्णत: परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होता. हे परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयात सिद्ध करुन दाखवले. मनुष्य खोटं बोलू शकतो, परिस्थिती खोटं बोलू शकत नाही, याचा प्रत्यय खटल्यात आला. आरोपी क्रमांक एकचा रक्तग्रुप 'ओ' होता, तर मुलीचा रक्तग्रुप 'ए' होता. आरोपीच्या कपड्यांवर जे रक्त मिळलं, त्यावरील रक्तग्रुप 'ए' होता आणि आरोपी हे सिद्ध करु शकला नाही. " तसंच या घटनेपूर्वी आणि घटनेनंतर आरोपी 2 आणि 3 त्यांचं कृत्य काय होतं, याचा पुरावा आम्ही कोर्टात दिला आणि न्यायालयाने हा पुरावा ग्राह्य धरला, असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं. आरोपींना शिक्षा किती? या खटल्यात दोन शिक्षा आहेत. खून करणं आणि खुनासाठी कट रचणं किंवा खुनासाठी प्रोत्साहित करणं या आरोपांखाली कमीत कमी जन्मठेप आणि जास्तीत जास्त फाशीची शिक्षा आहे. आरोपींना कुठली शिक्षा योग्य राहिल यासाठी खटल्यातील सर्व पुराव्यांचा विचार करुन मी माझा युक्तिवाद पुढे करणार आहे. कोर्टात काय झालं? कोर्टात आज तीनही आरोपींवरील दोष सिद्ध झाले. सुरुवातीला न्यायाधीशांनी आरोपींना कठड्यात उभं केलं. तीनही आरोपींना नाव विचारुन, त्यांचं वय विचारलं. मग न्यायालयाने तिघांवर ठेवण्यात आलेले आरोप त्यांना वाचून दाखवले. तिघांवर बलत्कार, कटकारस्थान आणि हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यानंतर तिघांवरील दोष सिद्ध करण्यात आले. कलम 120 ए, 376 (बलात्कार) आणि 302 (हत्या) अशा कलमांन्वये लावलेले आरोप सिद्ध झाले आहेत. काय आहे नेमकं प्रकरण? अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डीमध्ये 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने राज्य ढवळून निघालं होतं. या प्रकरणी पोलिसांनी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना अटक करण्यात आली होती. जलदगती न्यायालयात सुनावणी करुन आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली. 31 जणांच्या साक्ष कोपर्डी खटल्यात आतापर्यंत 31 जणांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात सर्व साक्षीदारांच्या साक्षी पूर्ण झाल्या आहेत. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांच्यावर कटकारस्थान करुन बलात्कार आणि हत्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. राज्यभरात मराठा मूक मोर्चे कोपर्डी घटनेच्या संतापाची लाट राज्यभर पसरली. या घटनेचा निषेध म्हणून राज्यभरात मराठा क्रांती मूकमोर्चे निघाले. औरंगाबादेत 9 ऑगस्ट 2016 रोजी पहिला मराठा मूक मोर्चा निघाला. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या संख्येने मोर्चे काढण्यात आले. कोपर्डी बलात्कार आणि हत्येचा घटनाक्रम… 13 जुलै 2016 – रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान पीडितेवर अमानुष अत्याचार करुन हत्या 15 जुलै 2016 – जितेंद्र शिंदेला श्रीगोंद्यात अटक 16 जुलै 2016 – संतोष भवाळला अटक 17 जुलै 2016 – तिसरा आरोपी नितीन भैलुमे अटकेत 18 जुलै 2016 – दोन आरोपींवर जिल्हा न्यायालय परिसरात हल्ला 24 जुलै 2016 – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोपर्डीला भेट 7 ऑक्टोबर 2016 – तिन्ही आरोपींविरोधात जिल्हा न्यालयात दोषारोपपत्र दाखल 1 एप्रिल 2017 – कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपींवर शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हा न्यायालयाच्या आवारात हल्ला 22 जून 2017 – खटल्यात सरकारी पक्षाने एकूण 31 साक्षीदार तपासले 2 जुलै 2017 – कोपर्डीत सूर्योदय संस्थेच्यावतीने निर्भयाचं स्मारक बांधण्याच निर्णय 12 जुलै 2017 – कोपर्डी घटनेच्या एक वर्षाच्या पूर्वसंध्येला नगरला कॅण्डल मार्च 13 जुलै 2017 – घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याने निर्भयाला श्रद्धांजली अर्पण 9 ऑक्टोबर 2017 – खटल्याचा अंतिम युक्तिवाद पूर्ण 18 नोव्हेंबर 2017 - तिन्ही आरोपी आठ विविध गुन्ह्या अंतर्गत दोषी, जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल, 22 तारखेला शिक्षेची सुनावणी संबंधित बातम्याLIVE कोपर्डी बलात्कार-हत्या: तीनही आरोपी दोषी, 22 तारखेला शिक्षा
कोपर्डी प्रकरणी आजपासून सत्र न्यायालयात अंतिम युक्तिवाद कोपर्डी बलात्कार आणि हत्येला एक वर्ष पूर्ण कोपर्डी बलात्कार: साक्षीदारांच्या यादीत मुख्यमंत्र्यांचं नाव! कोपर्डी बलात्कार : तपासात जात आडवी येणार नाही : मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल, राणे आणि धनंजय मुंडे चेकमेट ! कोपर्डी बलात्कार: तुमची -आमची मुलगी समजून कारवाई करा : अजित पवार नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर मुख्यमंत्र्यांना आर्चीला भेटायला वेळ, मात्र पीडित कुटुंबीयांसाठी नाही : तृप्ती देसाई अहमदनगरमधील कोपर्डीतल्या बलात्कार पीडितेचं स्मारक काय म्हणाले उज्ज्वल निकम?अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement