एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गोळाफेक करताना लोखंडी गोळा डोक्यात बसून विद्यार्थी जखमी
सातवीत शिकणारा कृषीराज मधल्या सुट्टीत खो-खो खेळत होता. त्यावेळी शेजारी गोळाफेकचा सराव करणाऱ्या मुलाच्या हातून गोळा सुटला आणि थेट कृषीराजच्या डोक्यावर बसला.
कोल्हापूर : खो खो खेळताना गोळाफेक खेळणाऱ्या मुलाकडून साडेतीन किलोंचा लोखंडी गोळा लागल्याने शाळकरी विद्यार्थी जखमी झाला आहे. कोल्हापूरच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सातवीत शिकणारा कृषीराज वर्धन या घटनेत जखमी झाला आहे.
सातवीत शिकणारा कृषीराज सहा तारखेला मधल्या सुट्टीत खो-खो खेळत होता. त्यावेळी शेजारी गोळाफेकचा सराव करणाऱ्या मुलाच्या हातून गोळा सुटला आणि थेट कृषीराजच्या डोक्यावर बसला. 8 पौंड वजनाचा लोखंडी गोळा डोक्याला लागल्याने कृषीराज गंभीर जखमी झाला.
मैदानावरील इतर मुलांनी कृषीराजला उचलून शाळेत आणलं. शाळेने त्वरीत कृषीराजच्या पालकांना तो खेळताना पडल्याची माहिती दिली.
ही घटना शाळेच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. जखमी कृषीराजवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी शाळा प्रशासनाने त्याच्या औषधोपचाराचा संपूर्ण खर्च उचलला आहे. मात्र शाळेनं तात्काळ उपचार केले नसल्याचा आरोप कृषीराजच्या पालकांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement