एक्स्प्लोर
आंबा घाटात गव्यांची झुंज, गरोदर मादीचा मृत्यू
आंबा गावाजवळीत वनविसावा रिसॉर्ट परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली.

कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावरील आंबा गावाजवळ बुधवाडीच्या मानवी वस्तीत गरोदर मादी गव्याचा मृत्यू झाला. दोन गव्यांच्या झुंजीत गरोदर मादीला जीव गमवावा लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
आंबा गावाजवळीत वनविसावा रिसॉर्ट परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली. नाचणीच्या शेतात दोन गव्यांची झुंज झाली. त्यात गरोदर असलेल्या मादी गव्याचा मृत्यू झाला. गावकऱ्यांना आज सकाळी या घटनेबाबत समजलं.
स्थानिकांनी याची माहिती वन विभागाला दिली आहे, परंतु अद्याप वन कर्मचारी इथे पोहोचलेले नाहीत.
दरम्यान, आंबा परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेक-गॅजेट
आशिया कप 2022
अमरावती
भारत
Advertisement
Advertisement



















