एक्स्प्लोर
पाच वर्षांच्या मुलीला बंधाऱ्यावर सोडून दाम्पत्याची नदीत उडी
कोल्हापुरात एका दाम्पत्याने कुंभी नदीपात्रात उडी घेतल्याची घटना समोर आली आहे. बेपत्ता दाम्पत्याचा शोध सुरु असून यामागील कारणही अद्याप अस्पष्ट आहे.
कोल्हापूर : कोल्हापुरात एका दाम्पत्याने कुंभी नदीपात्रात उडी घेतल्याची घटना समोर आली आहे. बेपत्ता दाम्पत्याचा शोध सुरु असून यामागील कारणही अद्याप अस्पष्ट आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील कळे गावाजवळ कुंभी नदीच्या पात्रात श्रीकांत धोंडी कांबळे आणि लता हे दाम्पत्य रविवारी बेपत्ता झालं. पाच वर्षांची मुलगी उत्कर्षा आजारी असल्यामुळे पणुत्रे येथून कळे येथील रुग्णालयात तिला दाखवण्यासाठी घेऊन जातो, असं नातेवाईकांना सांगून श्रीकांत आणि लता हे रविवारी सकाळी दुचाकीवरुन बाहेर पडले.
अकरा वाजण्याच्या सुमारास कुंभी नदीवरील गोठे बंधाऱ्यावर पाच वर्षाची उत्कर्षा रडत बसल्याचं पादचाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यांनी चौकशी केली असता आई-वडिलांनी नदीत उडी मारल्याचं मुलीने सांगितलं. याबाबत तात्काळ पोलिस पाटलांना कळवण्यात आलं.
कळे पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी श्रीकांत यांच्या वडिलांशी संपर्क साधला. घाबरलेल्या उत्कर्षाला पोलिसांनी श्रीकांत यांच्या वडिलांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेतली आहे. पाण्यात पडलेल्या श्रीकांत आणि लता यांचा शोध अद्याप सुरु आहे.
पोलिसांनी व्हाईट आर्मीच्या जवानांना पाचारण केले असून ते कुंभी नदीपात्रात या दाम्पत्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अधिक माहिती पोलिस घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement