एक्स्प्लोर

भाजप खासदार सोमय्यांनी सर्वाधिक निधी वापरला, अत्यल्प वापरणारे पाच कोण?

भाजपचे ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांनी सर्वाधिक म्हणजे 100% खासदार निधी वापरल्याचं समोर आलं आहे. सोमय्या यांनी खासदार निधीतले संपूर्ण 25 कोटी रुपये वापरले. तर बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी 25 कोटींपैकी फक्त 7.32 कोटी खासदार निधी वापरला.

मुंबई : लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसं विद्यमान खासदारांच्या गेल्या पाच वर्षातील कामगिरीचा आढावा घेतला जात आहे. आपल्या खासदाराने संसदेत किती वेळा स्थानिक प्रश्न मांडले, किती वेळा हजेरी लावली, मतदारसंघात किती निधी खर्च केला, याची उत्सुकता मतदारराजाला आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त खासदार निधी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी वापरला, तर अल्प खासदार निधी वापरणाऱ्या खासदारही भाजपच्याच आहेत, त्या म्हणजे प्रीतम मुंडे. भाजपचे ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांनी सर्वाधिक म्हणजे 100% खासदार निधी वापरल्याचं समोर आलं आहे. सोमय्या यांनी खासदार निधीतले संपूर्ण 25 कोटी रुपये वापरले. तर बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी 25 कोटींपैकी फक्त 7.32 कोटी खासदार निधी वापरला. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर 2014 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या प्रीतम मुंडे निवडून आल्या होत्या. सर्वाधिक निधी वापरणाऱ्या महाराष्ट्रातील टॉप 5 खासदारांमध्ये भाजपचे चौघे आहेत, तर एक शिवसेनेचा आहे. त्यापैकी दोघे जण मुंबईतील खासदार आहेत. तर राज्यातील सर्वात कमी निधी वापरणाऱ्या पाच खासदारांमध्येही भाजपचे तिघे, शिवसेना-राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक खासदार आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक प्रश्न विचारुन यंदा संसदरत्न पटकवणाऱ्या सुप्रिया सुळेही कमी खासदार निधी वापरणाऱ्यांच्या यादीत आहेत. राज्यात सर्वात जास्त निधी वापरणारे खासदार किरीट सोमय्या  25 कोटी - ईशान्य मुंबई (भाजप) रामदास तडस  23.57 कोटी - वर्धा (भाजप) श्रीकांत शिंदे  20.34 कोटी - कल्याण (शिवसेना) हीना गावित 20.23 कोटी - नंदुरबार (भाजप) पूनम महाजन 20.22 कोटी - उत्तर मध्य मुंबई (भाजप) राज्यात सर्वात कमी (50 टक्क्यांपेक्षा कमी) निधी वापरणारे खासदार प्रीतम मुंडे  7.32 कोटी - बीड (भाजप) भावना गवळी 10.55 कोटी - यवतमाळ वाशिम (शिवसेना) रावसाहेब दानवे 10.67 कोटी - जालना (भाजप)- प्रदेशाध्यक्ष रक्षा खडसे 10.89 कोटी - रावेर, जळगाव (भाजप) सुप्रिया सुळे 12.65 कोटी - बारामती (राष्ट्रवादी) उदयनराजे भोसले 12.46 कोटी - सातारा (राष्ट्रवादी) महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, राजीव सातव, श्रीरंग बारणे, धनंजय महाडिक, हीना गावित या लोकसभा खासदारांना आणि राज्यसभा खासदार असलेल्या रजनी पाटील यांना संसदरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. संसदेत अभ्यासपूर्ण कामगिरी करणाऱ्या, सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदारांना हा सन्मान दिला जातो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget