Kirit Somaiya: मढमधील कथित स्टुडिओ घोटाळा, सोमय्यांकडून पाहणी; अस्लम शेख, आदित्य ठाकरेंवर निशाणा
Maharashtra: मुंबईच्या (Mumbai) मढ येथील एक हजार कोटींच्या स्टुडिओ घोटाळ्यांची भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पाहणी केलीय
Maharashtra: मुंबईच्या (Mumbai) मढ येथील एक हजार कोटींच्या स्टुडिओ घोटाळ्यांची भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यासह भाजप नेते गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, योगेश सागर आणि इतर काही पदधिकारी यांनी आज पाहणी केलीय. कथित स्टुडिओ घोळाल्यावरून किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय त्यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावरही निशाणा साधलाय.
दरम्यान, सीआरझेड नियमांचे येथे उल्लंघन झालंय.सहा महिन्यांची तात्पुरता सेट लावण्याची परवानगी असताना इथलं बांधकाम आहे तसचं कसं राहिलं? हा प्रश्न उपस्थित 1000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय. मढ मार्वे परिसरात पाच स्टुडिओंचा सेट आहे. या परिसरात स्मशान भूमी उभारण्याची परवागणी देण्यात आली नाही. मग स्टुडिओ कसे उभारले गेले? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. याच मुद्द्यावरून अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय. 2021 च्या जुलै महिन्यात आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांनी या परिसराची पाहणी केली होती. तेव्हा सहा महिन्यांची परवानगी संपलेली होती. 2019 जुलैमध्ये येथे कुठंलही बांधकाम नव्हतं. पण रातोरात हे बांधकाम झालं. 2021 मध्ये परवानगी संपलेली असताना आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्या पाहणीनंतर हे सेट तसेच ठेवले गेले. कोणतंही पाडकाम करण्यात आलं नाही. आणि हे तात्पुरतं बांधकाम नसून पक्क बांधकाम आहे, असं किरीट सोमय्यांनी म्हटलंय. हे सीआरझेड नियमांचं उल्लंघन असून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केलीय.
पर्यावरण मंत्रालयाकडून अधिकृत परवानगी
"अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांनी स्टुडिओचा दौरा केला होता. 28 कमर्शिअल बांधकाम, 10 लाख स्क्वेअर फुटचं बांधकाम आहे. यासाठी पर्यावरण मंत्रालयानं याकरीता परवानगी अधिकृत परवानगी दिली होती. पर्यावरण मंत्र्यांना विचारतो, आरे संदर्भात एवढं धत्तिंग केलं, इथे तुम्हाला पर्यावरण दिसलं नाही का? या प्रकरणी शिंदे-फडणवीस सरकारनं यासंदर्भात चौकशी सुरु केलीय. कोव्हिड काळात बांधकाम केलं हे आदित्य ठाकरेंना दिसलं नाही का? तिकडे परबचा रिसोर्ट तुटणार आणि इकडे अस्लम शेख आणि आदित्य ठाकरेंच्या आशीर्वादाचे स्टुडिओ तुटणार", असं किरीट सोमय्या म्हणाले.
आदित्य ठाकरेंवर निशाणा
आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण मंत्रालयाने परवानगी दिली. मी केंद्र सरकारकडे जात तक्रार केल्यानंतर त्यांनी विचारलं कोणत्या नियमांतर्गत परवानगी दिली. 22 फेब्रुवारी 2021 रोजी पर्यावरण मंत्रालयानं परवानगी दिली ती बेकायदेशीर होती. दुसरीकडे परवानगी 6 महिन्यासाठी होती आणि 19 महिने झाले आहेत. स्टुडिओ समुद्रात बांधले आहेत, त्यामुळं हे तर तुटणारच", असंही किरीट सोमय्यानं म्हटलंय.
हे देखील वाचा-