Job Majha : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 900 जागांसाठी आणि युनियन बँक ऑफ इंडियाची जाहिरात प्रसिद्ध; असा करा अर्ज
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तब्बल 900 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली असून त्यासाठी अर्ज मागवले आहेत.
मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांसाठी तब्बल 900 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच युनियन बँक ऑफ इंडियानेही विविध पदांच्या 25 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा हे जाणून घेऊया.
एकूण जागा : 900 जागांवर भरती होते आहे.
1) उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय
जागा - 103
शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी किंवा विज्ञान शाखेत पदवी
---------
2) दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क
जागा - 114
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
--------
3) कर सहाय्यक, गट-क
जागा - 117
शैक्षणिक पात्रता : पदवीधर, मराठी आणि इंग्रजी टंकलेखन
--------
4) लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क
जागा - 473
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
-------
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट - mpsconline.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरता येईल आणि सविस्तर माहिती जाणून घेता येईल
----------------------
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 25 जागांसाठी भरती निघाली आहे.
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वरिष्ठ व्यवस्थापक
जागा - 09
शैक्षणिक पात्रता : बी.ई, बी.एस्सी. (संगणक विज्ञान), एमसीए/ एमए/ एमबीए ) अनुभव
----------------------
2) व्यवस्थापक
जागा - 16
शैक्षणिक पात्रता : बी.ई., बी.एस्सी. (संगणक विज्ञान), एमसीए/ बी.टेक./ एम.टेक.आयटी/ डाटा सायन्स/ पदव्युत्तर पदवी / अभियांत्रिकी पदवी / ईसीई/ एम.एस्सी./ एमए ) अनुभव.
अधिकृत संकेतस्थळ : www.unionbankofindia.co.in
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 जानेवारी 2022
महत्त्वाच्या बातम्या :
- Bank Recruitment : कनिष्ठ अधिकारी पदाच्या 300 रिक्त जागांसाठी भरती, येथे करा अर्ज
- Job Majha : सारस्वत को-ऑप बँक लि., NEERI, पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान येथे नोकरीची संधी
- Job Majha : महाराष्ट्र लोक सेवा आयोग, NIFT आणि सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरीची संधी