Job Majha: बँक ऑफ बडोदामध्ये 220 तर DRDO मध्ये 150 जागांसाठी भरती सुरू, असा करा अर्ज
Job Majha: बँक ऑफ बडोदा आणि DRDO तसेच सांगलीतील आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलमध्ये भरती सुरू आहे. जाणून घ्या त्यासंबंधी सविस्तर माहिती...
Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
सध्या बँक ऑफ बडोदा, DRDO तसेच सांगलीतील आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलमध्ये भरती सुरू आहे. जाणून घेऊया त्यासंबंधी सविस्तर माहिती...
बँक ऑफ बडोदा, महाराष्ट्र
पोस्ट- विभागीय विक्री व्यवस्थापक, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक, सहायक उपाध्यक्ष, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक.
एकूण जागा – 220
शैक्षणिक पात्रता – पदवीधर
तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2022
वयोमर्यादा – विभागीय विक्री व्यवस्थापक पदासाठी 32 ते 48 वर्ष, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक पदासाठी 28 ते 45 वर्ष, सहायक उपाध्यक्ष पदासाठी 28 ते 40 वर्ष, वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी 25 ते 37 वर्ष, व्यवस्थापक पदासाठी 22 ते 35 वर्ष ही वयोमर्यादा हवी.
अधिकृत वेबसाईट - www.bankofbaroda.in
या वेबसाईटवर गेल्यावर about us मध्ये careers वर क्लिक करा. त्यात current opportunities मध्ये know more वर क्लिक केल्यावर सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टंसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.
DRDO RCI
पोस्ट – अप्रेंटिस (यात पदवीधर अप्रेंटिससाठी 40 जागा, डिप्लोमा अप्रेंटिससाठी 60 जागा आणि ट्रेड अप्रेंटिससाठी 50 जागा आहेत.
एकूण जागा- 150
शैक्षणिक पात्रता - पदवीधर अप्रेंटिससाठी B.E/B.Tech (ECE/ EEE/ CSE/ मेकॅनिकल/ केमिकल],B.Com/BSc.. डिप्लोमा अप्रेंटिससाठी ECE/ EEE/ CSE/ मेकॅनिकल/ केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, ट्रेड अप्रेंटिससाठी ITI (फिटर/ टर्नर/ इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक & वेल्डर) ही शैक्षणिक पात्रता हवी.
नोकरीचं ठिकाण- हैदराबाद
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 फेब्रुवारी 2022
वयोमर्यादा – 18 वर्ष पूर्ण
अधिकृत वेबसाईट - rcilab.in
आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल, सांगली
पोस्ट – शिक्षक (टिचर)
एकूण जागा – 14
शैक्षणिक पात्रता – M.Sc., B.Ed. M.Com, M.Sc. (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर मिळेल.)
तुम्हाला अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 10 फेब्रुवारी 2022
अर्ज पाठवण्याचा पत्ता - अप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल, रेल्वे स्टेशनच्या मागे, शिंदे मळा, सांगली- 416416
अधिकृत वेबसाईट - www.abpssangli.edu.in
वरील वेबसाईटवर गेल्यावर career with us वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.
संबंधित बातम्या:
- Job Majha: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. आणि नॅशनल केमिकल अॅन्ड फर्टिलायझर्स लि. मध्ये भरती सुरू, असा करा अर्ज
- Job Majha : दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी, बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटरमध्ये 65 जागांसाठी भरती सुरू
- Job Majha : सीमा सुरक्षा दल आणि नवोदय विद्यालय समितीमध्ये काम करण्याची संधी