Job Majha : सीमा सुरक्षा दल आणि नवोदय विद्यालय समितीमध्ये काम करण्याची संधी
Job Majha : अनेकजण चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला.
सीमा सुरक्षा दल
पोस्ट – कॉन्स्टेबल (ट्रेड्समन)
एकूण जागा – २ हजार ७८८ (यात कॉब्लरसाठी ९१ जागा, टेलरसाठी ४९, कुकसाठी ९४४ जागा, स्वीपरसाठी ६५० जागा अशा विविध पदांसाठी भरती होत आहे.
शैक्षणिक पात्रता – १०वी उत्तीर्ण, २ वर्षांचा अनुभव किंवा १ वर्षाच्या अनुभवासह संबंधित ट्रेडमध्ये ITI
वयोमर्यादा – १८ ते २३ वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ मार्च २०२२
अधिकृत वेबसाईट - bsf.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर भर्तीमध्ये भर्ती ओपनिंग्सवर क्लिक करा. View detail केल्यावर तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातींची सविस्तर माहिती मिळेल.)
नवोदय विद्यालय समिती (NVS)
एकूण १ हजार ९२५ जागांसाठी भरती होत आहे. यातल्या सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पहिली सर्वाधिक जागा असलेली पोस्ट आहे - ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (ग्रुप-C)
एकूण जागा – ६३०
शैक्षणिक पात्रता – १२वी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरियल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह १२वी उत्तीर्ण
दुसरी पोस्ट - मेस हेल्पर (ग्रुप-C)
एकूण जागा – ६२९
शैक्षणिक पात्रता – १०वी उत्तीर्ण, १० वर्षांचा अनुभव
तिसरी पोस्ट - इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप-C)
एकूण जागा – २७३
शैक्षणिक पात्रता – १०वी उत्तीर्ण, ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/प्लंबर), २ वर्षांचा अनुभव
चौथी पोस्ट – लॅब अटेंडंट (ग्रुप–C)
एकूण जागा – १४२
शैक्षणिक पात्रता – १०वी उत्तीर्ण, लॅब टेक्निकल डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा १२वी (विज्ञान) उत्तीर्ण
पाचवी पोस्ट – कॅटरिंग असिस्टंट (ग्रुप- C)
एकूण जागा – ८७
शैक्षणिक पात्रता – १०वी उत्तीर्ण, २ वर्षांचा कॅटरिंग डिप्लोमा किंवा १२वी उत्तीर्ण आणि कॅटरिंग डिप्लोमा, ३ वर्षांचा अनुभव
सहावी पोस्ट - स्टेनोग्राफर (ग्रुप-C)
एकूण जागा – २२
शैक्षणिक पात्रता – १२वी उत्तीर्ण, शॉर्ट हँड ८० श.प्र.मि.आणि इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. किंवा शॉर्ट हँड ६० श.प्र.मि. आणि हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.
सातवी पोस्ट - मल्टी टास्किंग स्टाफ (ग्रुप-C)
एकूण जागा - २३
शैक्षणिक पात्रता – १०वी उत्तीर्ण
आणखीनही विविध पदांसाठी भरती होत आहे. त्याची माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
वयोमर्यादा – १८ ते ४५ वर्ष
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० फेब्रुवारी २०२२
अधिकृत वेबसाईट - navodaya.gov.in
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI