Jitendra Awhad : शरद पवार हाच आमचा पक्ष आणि चिन्ह, फिनिक्सप्रमाणे राखेतून भरारी घेतील; जितेंद्र आव्हाडांचा विश्वास
Ajit Pawar Vs Sharad Pawar : शरद पवार हे फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आहेत, राख झाली तरी उभा राहतील आणि स्वतःचं विश्व निर्माण करतील असं शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.
मुंबई: राष्ट्रवादीच्या घडाळ्याच्या काट्यांचा फैसला लागला असून पक्ष आणि चिन्ह आता अजित पवार (Ajit Pawar) गटाला मिळालं आहे. त्यानंतर शरद पवार गटाकडून (Sharad Pawar) विविध प्रतिक्रिया येत आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर टीका केली आहे. ज्या बापाने तुम्हाला उभं केलं त्याला सोडून जाताना लाज वाटली नाही का असा सवाल त्यांनी विचारला. शरद पवार हे फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आहेत, राख झाली तरी उभा राहतील आणि स्वतःचं विश्व निर्माण करतील त्यांनी म्हटलंय. तसेच शरद पवार हाच आमचा चेहरा आहेत, तेच चिन्हा आणि पक्ष आहेत असंही ते म्हणाले.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? (Jitendra Awhad On Ajit Pawar)
पक्ष जन्माला कुणी घातला, कुणी वाढवला? त्यावर तुमचा काय अधिकारल आहे? अजित पवारांना उपमुख्यमंत्री कोण केलं? तटकरेंना, मुश्रीफांना, वळसेंना कोण मंत्री केलं? हे सगळ्यांना माहिती आहे. पक्ष चोरताना तुम्हाला लाज वाटत नाही का? आज मरणासन्न यात्रा होत असतील पवार साहेबांना. आम्हाला माहिती आहे त्यांची ताकद काय आहे. जवळच्या माणसांनी शरद पवारांना अधू करण्याचा प्रयत्न केला. निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे नुरा कुस्ती आहे. महाराष्ट्राच्या जनतेला समजत नाही का? आमची बाजू एकदम मजबूत आहे, पण आयोगासमोर कुणाचं काही चालत नाही.
आमचा चेहरा शरद पवार, चिन्ह आणि पक्ष हेदेखील पवार
अजित पवार गटाला पक्ष आणि निवडणूक चिन्ह गेल्यानंतर शरद पवार गटाला आता नवीन पक्षाचं नाव आणि चिन्ह घ्यावं लागेल. त्यावर कोणतं चिन्ह ठरलंय का या प्रश्नावर उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आमचा चेहरा, पक्ष आणि चिन्हं म्हणजे शरद पवार.
ज्यांनी अजित पवार आणि त्यांच्या साथिदारांना तयार केलं तो, या सगळ्यांचा बाप आमच्यासोबत आहे असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
अजित पवारांसोबत किती आमदार?
- महाराष्ट्रातील 41आमदार
- नागालँडमधील 7 आमदार
- झारखंड 1 आमदार
- लोकसभा खासदार 2
- महाराष्ट्र विधानपरिषद 5
- राज्यसभा 1
शरद पवारांसोबत किती आमदार?
महाराष्ट्रातील आमदार 15
केरळमधील आमदार 1
लोकसभा खासदार 4
महाराष्ट्र विधानपरिषद 4
राज्यसभा - 3
ही बातमी वाचा: