एक्स्प्लोर

Jalgaon News : सोसायटी अध्यक्ष पदाच्या निवडीवरून दोन गटात गदारोळ, जळगावमधील घटना   

Government Servant Society : जळगावच्या ग. स. सोसायटीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहकार, लोकसहकार आणि प्रगती पॅनल पैकी एका ही पॅनलला बहुमत मिळाले नसल्यानेमुळे जोरदार चुरस निर्माण झाली. त्यातून संचालक फोडाफोडीचे प्रयत्न सुरू होते.

Jalgaon News Update : जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी असलेल्या ग. स.  सोसायटीच्या (Government Servant Society) अध्यक्षपदाच्या निवडीवरून मोठा गदारोळ झाला आहे. संचालक फोडल्यावरून दोन्ही गटात जोरदार शिवीगाळ आणि धक्का - बुक्की झाली. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. 

ग.स. सोसायटीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत  सहकार, लोकसहकार आणि प्रगती पॅनल पैकी एकालाही बहुमत मिळाले नसल्यानेमुळे जोरदार चुरस निर्माण झाली. त्यातून संचालक फोडाफोडीचे प्रयत्न सुरू होते. याच कारणावरून आज अध्यक्षपदाची निवड होण्यापूर्वीच तिन्ही गटाचे सदस्य रस्त्यावरच एकमेकांवर धावून गेले. 

जळगावर शहर पोलीस ठाण्याच्या पाठीमागे हा प्रकार घडत असल्यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी यावेळी मध्येस्थी करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थीती आटोक्यात येत नसल्याचं लक्षात येताच  पोलिसांनी सोम्य लाठीमार केला आणि परिस्थिती नियतंत्रत आणली. 

संचालक पळवापळवीवरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सहकार गटाने गळाला लावलेले दोन्ही सदस्य मतदानाच्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर त्यांना निवडणुकीत सहभागी होऊ न देण्यासाठी आणि जाब विचाण्यासाठी गाडीतून उतरू देणार नसल्याची भूमिका लोकसहकार गटाने घेतली होती. याच विषयावरून दोन्ही गटात गदारोळ झाला. 

आशिया खंडातील सर्वात मोठी पतपेढी

आशिया खंडातील सर्वात मोठी पतपेढी असलेल्या ग.स. सोसायटीची निवडणूक यंदा चुरशीची झाली असून सहकार, लोकसहकार आणि प्रगती शिक्षक पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मतदारांनी कोणत्याच गटाला बहुमत दिले नसून सहकार गटाला नऊ, लोकसहकार गटाला सहा तर प्रगती शिक्षक गटाच्या सहा संचालकांना संधी मिळाली. अध्यक्ष निवडीसाठी 11 चा जादुई आकडा गाठावा लागणार असल्याने सहकार गटाने लोकसहकार गटाचे दोन संचालक गळाला लावले होते. आज दुपारी अध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर हे संचालक मतदानासाठी पोहचत होते.
 
सहकार गटाचे सदस्य चारचाकीने मतदानस्थळी पोहचल्यानंतर लोकसहकार गटातून फोडलेल्या ज्ञानेश्वर सोनवणे आणि रवींद्र सोनवणे यांना गाडीतून बाहेर पडू न देण्याची भूमिका लोकसहकार गटातर्फे घेण्यात आली. दोन्ही गटाच्या सदस्यांमध्ये यावेळी जोरदार शिवीगाळ आणि धक्का-बुक्की झाली. 

सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह पोलिसांनी तगडा फौजफाटा तैनात करत सहकार गटाच्या सर्व संचालकांना सुखरूपप सभागृहात पाठविले.

"लोकसहकार गटाचे सहा आणि प्रगती शिक्षक सेना गटाचे सहा सदस्य निवडून आले होते. बहुमतासाठी 11 सदस्यांचा आकडा आवश्यक होता. आमच्याकडे 12 सदस्य होते. सहकार गटाने आमच्या गटातील दोन सदस्यांना आमिष दाखवून पळवून नेले. आम्ही त्यांना आमच्या गटातून निवडून दिले. परंतु, ते पळून गेले, त्यामुळे आम्ही त्यांना जाब विचारत होतो, दुसरा काहीही प्रकार नव्हता. आमच्यातर्फे रावसाहेब पाटील हे अध्यक्षपदाचे उमेदवार असून सभागृहात काहीही होऊ शकते, अशी माहिती लोकसहकार गटाचे प्रमुख मनोज पाटील यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

Sambhajiraje Chhatrapati : 'स्वराज्य' संघटना अन् राज्यसभेची अपक्ष निवडणूक, संभाजीराजेंच्या पत्रकार परिषदेतील दहा महत्वाचे मुद्दे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार? अंमलबजावणी कधीपासून?
केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार?
Saif Ali Khan Attacker First Footage: हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 17 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 17 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सKolhapur Crime CCTV : कोल्हापुरात मद्यधुंद तरुणांची दहशत, चालत्या बसवर फेकला मोठा दगडNigerian Arrested: टीप मिळताच पोलिसांनी सापळा रचला, MD ड्रग्जसह नायजेरियनला अटक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार? अंमलबजावणी कधीपासून?
केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार?
Saif Ali Khan Attacker First Footage: हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Saif Ali Khan Stabbing Incident:
"आपको क्या चाहीये?... 1 करोड... जेहच्या रुममध्ये घुसून त्यानं पैसे मागितले"; सैफवर हल्ला झाला 'त्या' रात्री काय-काय घडलं?
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Embed widget