एक्स्प्लोर
शिववड्याची गाडी तोडली, मनपा अधिकाऱ्याला सेना पदाधिकाऱ्याने काळं फासलं

कल्याण : शिववडापावची गाडी तोडल्याच्या रागातून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्याला काळं फासल्याची घटना समोर आली आहे. कल्याण-डोंबिवलीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानं मनपाच्या प्रभाग अधिकाऱ्याला काळं फासलं. अधिकारी अरुण वानखेडे यांना शिवसेना चर्मकार सेनेचे अध्यक्ष श्यामराव क्षीरसागर यांनं काळं फासलं. या घटनेमुळे संतप्त झालेल्या महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी शिवसेनेचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कोंडून ठेवलं. कोंडून ठेवल्यानंतर शिवसैनिकांना पोलिसांच्या महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी उपस्थितीतच मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे महापालिकेत चांगलाच गोंधळ माजला होता.
आणखी वाचा























