एक्स्प्लोर
Advertisement
डोक्यावर घमेलं घेऊन वेठबिगारी, इंदापुरातील सरपंचाची कहाणी
इंदापूर : ज्यांच्या आजूबाजूला मोठ्या गाड्यांचा ताफा असतो, दिमतीला अनेक कार्यकर्ते असतात, अशा अनेक व्यक्ती राजकारणातल्या पाहायला मिळतात. मात्र डोक्यावर घमेलं घेऊन मजुरी करणाऱ्या पल्लवी शिंदे यात उठून दिसतात. केवळ वेठबिगारी करणाऱ्या कामगार म्हणून त्यांची ओळख नाही, तर प्रपंचाच्या गाड्याबरोबरच त्या गावगाडाही हाकत आहेत. इंदापूरच्या व्याहळी गावच्या सरपंच पल्लवी शिंदे यांची कामगिरी म्हणूनच उल्लेखनीय ठरते.
राज्यात अनेक ठिकाणी महिल्या या गावचा कारभार चालवतात पण व्याहळी गावच्या या सरपंच महिलाची कहाणी काही वेगळीच आहे.
दोन वर्षांपूर्वी पारधी समाजासाठी आरक्षित जागेवर पल्लवी शिंदे जिंकून आल्या आणि गावच्या सरपंच झाल्या. परंतु घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे त्यांना आजही रोजंदारीवर काम करावं लागत आहे.
दोन वर्षात गावचा चेहरा बदलण्याचा आणि गावात सोयीसुविधा आणण्याचा त्या प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. काही विकासकामांसाठी गावच्या उद्दाम लोकांचा त्यांना त्रासही सहन करावा लागतो.
राजकारण म्हटलं की डामडौल येतो आणि त्यासोबतच रुबाब. पण व्याहळीच्या सरपंचबाईंना पाहून आजही महिला सबलीकरणाचा प्रश्न अनुत्तरीतच राहिलाय का असं वाटून जातं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सांगली
Advertisement