एक्स्प्लोर

बहुचर्चित अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे अखेर अनावरण, मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा

बहुचर्चित अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे अखेर अनावरण करण्यात आले आहे. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला.

हिंगोली : औंढा नागनाथ येथील 8वे जोतिर्लिंग असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केला होता. त्यांच्या सन्मानार्थ उभरण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यावरून भाजप विरुद्ध शिवसेना असा वाद निर्माण झाला होता. अखेर या पुतळ्याचे अनावरण धनगर समाजाच्या ज्येष्ठ व्यक्तीच्या हस्ते आज सायंकाळी 6.30 वाजता करण्यात आल्याने पुतळ्याच्या अनवरणावरून सुरू झालेल्या वादाला पुर्णविराम मिळालाय. 

कोरोनामुळे वारंवार या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रखडले होते. शेवटी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या पुतळ्याचे अनावरण आपण 16 मार्च रोजी करणार असल्याचं जाहीर केल्यानंतर 11 मार्च रोजीच या पुतळ्याचा अनावरण करणार असल्याचं शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी जाहीर केलं होतं. मात्र, कोरोना आणि महाशिवरात्रीमुळं जास्त गर्दी जमू नये यामुळे प्रशासनाने या ठिकाणी परवानगी नाकारली होती. मात्र, दुपारी आमदार संतोष बांगर यांनी पुढाकार घेऊन महाशिवरात्रीच्या मुहूर्तावरच हा सोहळा साजरा करण्याचा निश्चय केला व औंढ्यात प्रशासनाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन त्यांनी प्रशासनाची परवानगी घेतली व  धनगर समाजातील 100 वर्षीय ज्येष्ठ नागरिक पांडुरंग पाटील मारकड यांच्या हस्ते कोरोना नियमांचे काटेकोर पालन करत साधेपणाने मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाले. 

यावेळी हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माजी आमदार रामराव वडकुते, अशोक नाईक, नगरसेवक राम कदम नागनाथ संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार कृष्णकांत कानगुले, बाबा नाईक, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख रेखाताई देवकते नागनाथ संस्थांचे सदस्य ॲडव्होकेट राजेश पतंगे, ॲड रवी शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख, केशव नाईक, सुरेंद्र ढाले, शिवाजी ढाले, शशिकांत वडकुते, विनोद नाईक गंगाप्रसाद पोले, लखन शिंदे, शंकर पोले, शिवम नाईक विलास मस्के, संभाजीराव देवकते, विलास पोले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget