इंग्लंडवरुन आलेल्या प्रवाशांच्या विशेष सर्वेक्षणात 16 जण कोरोनाबाधित
आतापर्यंत 1122 प्रवाशांची आर टी पी सी आर चाचणी करण्यात आली. यापैकी 16 प्रवाशी कोरोना बाधित आढळून आले आहेत.
मुंबई : ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नवीन करोना विषाणूमुळे बाधित झालेला संशयित रुग्ण नागपुरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर 25 नोव्हेंबर नंतर राज्यात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत 1122 प्रवाशांची आर टी पी सी आर चाचणी करण्यात आली. यापैकी 16 प्रवाशी कोरोना बाधित आढळून आले आहेत.
कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णांपैकी 4 रुग्ण नागपूरचे, मुंबई आणि ठाणे प्रत्येकी तीन रुग्ण, पुण्याचे दोन आणि नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद व रायगड योथील प्रत्येकी 1 रुग्ण आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय रचना शोधण्यासाठी एन आय व्ही पुणे येथे पाठविण्यात आले आहे. तसेच बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांता देखील शोध घेण्यात येत आहे. आजवर शोधण्यात आलेल्या 72 संपर्कातील व्यक्तींपैकी दोन व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या आहेत.
ब्रिटनहून येणाऱ्या सर्व हवाई वाहतुकीवर भारताकडून बंदी
जगभरातील देश कोरोना विषाणूशी लढत असताना आता ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळला आहे. हा विषाणू वेगाने पसरत असल्याने सगळेच देश सतर्क झाले आहेत. केंद्र सरकारनेही याची गंभीर दखल घेत ब्रिटन आणि भारतामधील विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. ही बंदी उद्या मध्यरात्रीपासून लागून होणार आहे. ब्रिटनच्या शासनाकडून व्हायरसचा हा नवा प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याचा इशारा देण्यात आल्यानंतर युरोपियन युनियनच्या अनेक राष्ट्रांनी तेथून येणाऱ्या उड्डाणांवर आणि सर्व विमान प्रवासावर बंदी घातली आहे. भारतातही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विमान वाहतूकीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. आता केंद्र सरकारनेही भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या हवाई प्रवासावर बंदी घातली आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे.
New Coronavirus Strain | कोरोनाच्या नव्या अवतारांची भिती बाळगू नका - डॉ. अरविंद देशमुख WEB EXCLUSIVE