एक्स्प्लोर

Maharashtra Politics Imtiyaz Jaleel : 'राज्यात ईडीचं सरकार स्थापन, दोनचे तीन सुपरवायझर झाले'; जलील यांची खोचक टीका

Imtiyaz Jaleel : 'राज्यात ईडीचं सरकार स्थापन झालेलं असून, आधी दोन सुपरवायझर होते, मात्र आता तीन झाले असल्याची खोचक टीका जलील यांनी केली आहे. 

Imtiyaz Jaleel On Maharashtra Political Crisis : अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला असून, यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या आहेत. तर एमआयएमचे खासदार यांनी देखील या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. 'राज्यात ईडीचं सरकार स्थापन झालेलं असून, आधी दोन सुपरवायझर होते, मात्र आता तीन झाले असल्याची खोचक टीका जलील यांनी केली आहे. 

आज महाराष्ट्रात ईडीचं सरकार स्थापन झालेलं आहे. त्यांच्याकडे आधी दोन सुपरवायझर होते, मात्र आता तीन झाले आहे. मोदींनी चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीबद्दल काय बोलले होते, हे जनता विसरलेली नाही. मात्र फडणवीस विसरले असतील. ज्यांच्यामुळे हे सगळ झालं त्यांनी राष्ट्रवादीबाबत काय बोलले, हे तुम्ही विसरले, पण जनता विसरली नसल्याचे म्हणत जलील यांनी फडणवीस यांचे भाषण ऐकवून दाखवली. 

तर सत्तेसाठी तुमची पार्टी कोणत्या पातळीवर जाऊ शकते. लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपच्या विरोधात मत दिले होतं. आता तुम्ही मोदींचं गुणगान करत आहेत. मोदी यांनी चांगले काम केलं हे कळण्यासाठी अजित पवार यांना नऊ वर्षे लागले. जनतेला काही कळत नाही का? असा सवाल देखील जलील यांनी उपस्थित केला आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रात फटाके फोडणार 

राज्याच्या राजकारणात काहीही राहिलेले नाही. मी ईडीला बोललो, आता मुश्रीफ यांची फाईल‌ बंद करणार आहे. अजित दादा तुम्ही राष्ट्रवादीला फोडले आहे. सत्तेसाठी तुम्ही गेले, पण अस कोणत्याही राज्यात घडत नाही. तुम्ही एमआयएमला बी टीम म्हणत होते, आता कोण गेले सत्तेत. तर आम्ही उद्या फटाके फोडणार असून, तुमंचे अभिनंदन करणार आहोत. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे अभिनंदन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फटाके फोडणार असल्याचे जलील म्हणाले. तसेच मोदींनी आणि भाजपने सर्व भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या डोक्यावर बसवले आहे. त्यामुळे सर्वात मोठे भ्रष्टाचारी तुम्ही आहात, असेही जलील म्हणाले. 

'आगे आगे देखो होता है क्या'

दरम्यान याचवेळी पुढे बोलताना जलील म्हणाले की,  काही नवीन राजकीय समीकरणे तयार होतील. त्यात आमचा खूप मोठा सहभाग असणार आहे. दलित आणि मुस्लिम भाजपासोबत कधी जाऊ शकत नाही. भाजपच्या विरोधात असल्यामुळे तुम्हाला मतदान केले होते.  मोदींनी केलेल्या आरोपाचा तुम्ही उत्तर द्याला ते घोटाळा तुम्ही केला की तुमच्या काकांनी केला आहे. लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणूका लवकर घेतल्या जाणार. तर एमआयएम महाविकास आघाडीसोबत जाणार का? यावर बोलताना 'आगे आगे देखो होता है क्या,' असे जलील म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

CM Eknath Shine on Ajit Pawar : अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री, शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale: विधानसभेसाठी आठवलेंनी फुंकलं रणशिंग, भाजपकडे केली इतक्या जागांची मागणी, प्रकाश आंबेडकरांनाही केलं आवाहन....
विधानसभेसाठी आठवलेंनी फुंकलं रणशिंग, भाजपकडे केली इतक्या जागांची मागणी, प्रकाश आंबेडकरांनाही केलं आवाहन....
Sharad Pawar In Satara : शरद पवारांची बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात 007 नंबरच्या कारमधून एन्ट्री; सर्वांच्याच भूवया उंचावल्या!
शरद पवारांची बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात 007 नंबरच्या कारमधून एन्ट्री; सर्वांच्याच भूवया उंचावल्या!
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची आपली लायकी नाही, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची आपली लायकी नाही, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
Satypal Malik Meet Uddhav Thackeray : सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा
Satypal Malik Meet Uddhav Thackeray : सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maratha Protester Meeting Varhsa : शिष्टमंडळासोबत शंभूराजे देसाई, मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा वर बैठकSatypal Malik Meet Uddhav Thackeray : सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चाLaxman Hake On Manoj jarange : जरांगे छत्रपतींच्या वारसावर खालच्या भाषेत टीका करतातManoj Jarange Patil Jalna PC : सुरुवात तुम्ही केली, शेवट मराठे करणार, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Athawale: विधानसभेसाठी आठवलेंनी फुंकलं रणशिंग, भाजपकडे केली इतक्या जागांची मागणी, प्रकाश आंबेडकरांनाही केलं आवाहन....
विधानसभेसाठी आठवलेंनी फुंकलं रणशिंग, भाजपकडे केली इतक्या जागांची मागणी, प्रकाश आंबेडकरांनाही केलं आवाहन....
Sharad Pawar In Satara : शरद पवारांची बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात 007 नंबरच्या कारमधून एन्ट्री; सर्वांच्याच भूवया उंचावल्या!
शरद पवारांची बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात 007 नंबरच्या कारमधून एन्ट्री; सर्वांच्याच भूवया उंचावल्या!
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची आपली लायकी नाही, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची आपली लायकी नाही, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
Satypal Malik Meet Uddhav Thackeray : सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा
Satypal Malik Meet Uddhav Thackeray : सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा
एकच वादा अजित  दादा! धाराशिवच्या दाजींना दिलेला शब्द अजित पवार पूर्ण करणार?
एकच वादा अजित दादा! धाराशिवच्या दाजींना दिलेला शब्द अजित पवार पूर्ण करणार?
Pune News: जुलूस मिरवणुकीत झेंडा फडकवताना दोघांना विजेचा शॉक; एकाचा मृत्यू, एक जखमी
जुलूस मिरवणुकीत झेंडा फडकवताना दोघांना विजेचा शॉक; एकाचा मृत्यू, एक जखमी
PM Modi US Visit : ट्रम्प की कमला? भारतासाठी कोण योग्य? मोदींकडून अमेरिकन संसदेत कमलांचे कौतुक, ट्रम्प यांना चांगले मित्र म्हटले होते; आता कोणासोबत?
ट्रम्प की कमला? भारतासाठी कोण योग्य? मोदींकडून अमेरिकन संसदेत कमलांचे कौतुक, ट्रम्प यांना चांगले मित्र म्हटले होते; आता कोणासोबत?
Lakshman Hake: छत्रपतींच्या वारसांना जरांगे खासगीत खालच्या भाषेत बोलतात, लक्ष्मण हाकेंचा दावा, म्हणाले...
छत्रपतींच्या वारसांना जरांगे खासगीत खालच्या भाषेत बोलतात, लक्ष्मण हाकेंचा दावा, म्हणाले...
Embed widget