एक्स्प्लोर

'अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल केले तर रॉबरीचा गुन्हा दाखल करा', आमदार संजय गायकवाड यांचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खामगावातील अंबिकापूर गावात कुटुंबाच्या सांत्वनासाठी गेले असता त्यांनी तिथे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे.

बुलढाणा : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा वादग्रस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात ते "कुणी खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करत असेल तर तुम्ही त्यांच्यावर रॉबरीचे गुन्हे दाखल करा. तुम्हाला कुणी त्रास दिला तर मी तुम्हाला अस्त्र-शस्त्राची सगळी ताकद पुरवतो," असं वक्तव्य करताना दिसत आहेत.

या वक्तव्यांना दहा दिवसांपूर्वी खामगावच्या अंबिकापूर गावात झालेल्या हिंसक घटनेची किनार आहे. खामगावच्या अंबिकापूरमध्ये वाघ आणि हिवराळे कुटुंबात जुने वाद होते. त्यातून काही दिवसांपूर्वी त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यात दोन्ही कुटुंबातील सदस्य जखमी झाले होते. यानंतर संजय गायकवाड हे वाघ कुटुंबाच्या सांत्वनासाठी गावात गेले असताना त्यांनी तिथं काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे.

संजय गायकवाड यांची वक्तव्ये दोन समाजातील स्वास्थ्य बिघडवणारी असल्याचे रिपाइं (खरात गट)नं म्हटलं आहे. त्यामुळे संजय गायकवाड यांची वक्तव्यं तपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रिपाइं खरात गटाने केली आहे.

संजय गायकवाड काय म्हणाले?

"एका मागच्या प्रकरणामध्ये आत्महत्या झाली, त्याची चिठ्ठी देखील सापडली, तरी गुन्हा दाखल झाला नाही. छोट्या मोठ्या गोष्टीतून दादागिरी करुन दोघांनी दहशत निर्माण केली. दुर्दैवाने सांगावं वाटतं की सर्व सामाजाने त्याला साथ दिली. बाबासाहेब आंबेडकर यांना असा समाज कधीच अपेक्षित नव्हता. बाबासाहेबांनी लोकांचं रक्षण करायला शिकवलं. परंतु आमच्या समाजाचे लोक अशाप्रकारच्या गालबोटाचं समर्थन करुन एका परिवारावर हल्ला करतात हे निश्चित दुर्दैवी बाब आहे. त्याचप्रमाणे मी या गावातील मुस्लीम समाजाचं मनापासून अभिनंदन करेन की या लोकांनी जातपात न पाहता इथल्या महिलांना मदत केली. भेदरलेल्या, घाबरलेल्या कुटुंबाला सहारा देण्याचा प्रयत्न केला. समाजातल्या, गावातल्या लोकांना मी सांगेन की जर कोणी अॅट्रॉसिटीचा खोटा रिपोर्ट देऊन ब्लॅकमेल करत असेल तर तुम्ही देखील डायरेक्ट रॉबरीची कम्प्लेंट त्याच्या क्रॉसमध्ये द्यायची. गळ्याला चाकू लावला, चैन हिसकली, पैसे खिशातले हिसकले, अशाप्रकारने तुम्ही तक्रार दिली तर झक मारुन अॅट्रॉसिटीची कम्प्लेंट मागे घेतो, हे सगळं पहिलं समजून घ्या. कोणी अॅट्रॉसिटीची कम्प्लेंट दाखल केली तर रॉबरी टाकायची म्हणजे टाकायची. कोणता ठाणेदार घेत नाही हे मग आम्ही पाहू."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
कॅन्सरग्रस्त 70 वर्षीय शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल गेल्या 23 दिवसांपासून फक्त पाण्यावर, शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची भीती
कॅन्सरग्रस्त 70 वर्षीय शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल गेल्या 23 दिवसांपासून फक्त पाण्यावर, शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची भीती
Astrology : यंदाची संकष्टी चतुर्थी 3 राशींसाठी ठरणार खास; 18 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
संकष्टी चतुर्थी 3 राशींसाठी ठरणार खास; 18 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas Meet Ajit Pawar:त्या 6-7 जणांचा आका कोण आहे? त्या आकांचा आका कोण?धस यांचा निशाणा कुणावर?MVA Government : मविआ काळात फडणवीस, शिंदेंना अटक करण्याच्या कटाचा तपास SIT मार्फतSanjay Raut Delhi : एकनाथ शिंदे, अजित पवारांचे पक्ष राहतील की नाही अशी शंका - राऊतChhagan Bhujbal Nashik : शक्तिप्रदर्शन करत भुजबळ काय भूमिका घेतात याकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
कॅन्सरग्रस्त 70 वर्षीय शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल गेल्या 23 दिवसांपासून फक्त पाण्यावर, शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची भीती
कॅन्सरग्रस्त 70 वर्षीय शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल गेल्या 23 दिवसांपासून फक्त पाण्यावर, शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची भीती
Astrology : यंदाची संकष्टी चतुर्थी 3 राशींसाठी ठरणार खास; 18 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
संकष्टी चतुर्थी 3 राशींसाठी ठरणार खास; 18 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची नांदी, विलासराव देशमुखांचा पुत्र मुख्य प्रतोद, प्रदेशाध्यक्ष पदासाठी 5 जण शर्यतीत
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची नांदी, विलासराव देशमुखांच्या मुलाला मोठी जबाबदारी, प्रदेशाध्यक्षपदी कोण?
PM Kisan Samman Yojana:मोठी बातमी, शेतकऱ्यांना पीएम किसानद्वारे 12 हजार मिळणार? संसदीय समितीची शिफारस, अंतिम निर्णय कधी? 
मोठी बातमी, शेतकऱ्यांना पीएम किसानद्वारे 12 हजार मिळणार? संसदीय समितीची शिफारस 
IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
IPO: पैसे तयार ठेवा, 1600 कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना मोठी संधी
Embed widget