लॉकडाऊनमध्ये यात्रेकरू निलंगा येथे पोहोचल्याची गंभीर दखल; पालकमंत्र्यांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
लॉकडाऊनमध्ये मुस्लीम यात्रेकरू निलंगा येथे पोहोचल्याची गंभीर दखल पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दखल घेतली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
मुंबई : देशात सर्वत्र लॉकडाऊन असताना आणि जमावबंदीचा आदेश लागू असताना दोन एप्रिलला मध्यरात्री लातूर जिल्ह्याच्या सीमा ओलांडून काही व्यक्ती लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे पोहोचले. यापैकी आठ यात्रेकरू कोरोनाग्रस्त असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. या घटनेची वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात यात्रेकरूंना निलंगा येथील मशिदीमध्ये आश्रय देण्यात आला होता. खरेतर असे अनोळखी व्यकी आढळून येताच याची माहिती संबंधितांनी पोलीस, जिल्हा प्रशासन किंवा जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने द्यावयास हवी होती. याप्रकरणी मशीद आणि मशिदीचे कार्यवाह यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याने चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यातील सर्वच निष्पाप नागरिकांना धोका निर्माण करण्याचा प्रकार पुढे आला आहे. या घटनेची कठोर शब्दात निंदा करीत असल्याचे सांगून यापुढे जिल्ह्यात असे प्रकार घडू नये. यासाठी प्रत्येकाने कायद्याचे कठोर पालन करावे असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले आहे.
लातूरमध्ये आठ मुस्लीम यात्रेकरूंना कोरोनाची लागण; उत्तर भारतातून दक्षिणेकडे सुरू होता प्रवास
लातूरमध्ये आठ मुस्लीम यात्रेकरूंना कोरोनाची लागण हरयाणा राज्यातील नुह जिल्ह्यातील फिरोजपूर झिरका येथे गेल्या तीन महिन्यांपासून धार्मिक कार्यासाठी वास्तव्यास असलेले 12 यात्रेकरू दोन एप्रिलच्या मध्यरात्री लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील मशिदीत आढळून आले होते. या 12 जणांचे स्वब तपासणीसाठी पुणे येथे पाठवले असता त्यातील आठ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. या कोवीड 19 पॉझिटिव्ह रुग्णांवर लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या महाविद्यालय रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रसार आता शहरातून गावाकडे होताना दिसत आहे. याला कारणीभूत ठरतायेत ते म्हणजे प्रवासी. आतापर्यंत गावाकडे कोरोनाची बाधा झालेले हे सर्वजण परदेश किंवा देशातील मोठ्या शहरातून गावकडे आल्याची माहिती समोर आली आहे.
Health Minister on #Corona | लॉकडाऊननंतरही देशातल्या सर्व जिल्ह्यांच्या सीमा दोन आठवडे सीलच राहण्याची शक्यता- केंद्रीय आरोग्यमंत्री