एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Hijab Controversy: कर्नाटकातील घटनेचे उदगीरमध्ये पडसाद, हिजाबच्या समर्थनार्थ हजारो महिला उतरल्या रस्त्यावर

Hijab Controversy: कर्नाटकमध्ये हिजाब प्रकरण चांगलंच तापलंय. यातच कर्नाटक उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये धार्मिक पोशाख घालण्यास मनाई केलीय.

Hijab Controversy: कर्नाटकमध्ये हिजाब प्रकरण चांगलंच तापलंय. यातच कर्नाटक उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये धार्मिक पोशाख घालण्यास मनाई केलीय. या घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. यावर विविध स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. या घटनेचे लातूर जिल्ह्यातही पडसाद उमटले आहेत. लातूरच्या उदगीर येथे हिजाबच्या समर्थनार्थ हजारो महिला रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं.

उदगीर शहरात हिजाबच्या समर्थनार्थ हजारो महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे धरणे आंदोलन पुकारले होतं. हिजाब आमचा अधिकार आहे, आमचा अधिकार कोणीही काढू शकत नाही, असा पवित्रा महिलांनी घेतला होता. आंदोलनातील महिलांची वाढती संख्या पाहून पोलीस प्रशासनाने मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. यामुळं शहरातून होणारी वाहतूक इतर मार्गानं वळविण्यात आली होती. शहरात शांतता सुरक्षित ठेवण्यासाठी आंदोलन स्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. यात आरसीपी पोलिसांची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत हिजाब आमचा हक्क आहे अशा घोषणा आंदोलक महिलांनी त्यावेळी दिल्या. या आंदोलनाला जमीयते उलेमा ए हिन्द ,राष्ट्रवादी कांग्रेस ,एमआयएम तसेच दलित अधिकार मंच यासह अनेक संघटना आणि पक्षाचा या आंदोलन पाठीबा होता. 

नेमकं प्रकरण काय?
हिजाब परिधान केल्यामुळं त्यांना वर्गात जाऊ दिले जात नसल्याचा आरोप उडुपी येथील सरकारी गर्ल्स पीयू कॉलेजच्या काही विद्यार्थिनींनी केल्यानंतर कर्नाटकात गेल्या महिन्यात निदर्शने सुरू झाली. तेव्हापासून राज्यात अनेक ठिकाणी अशांततेच्या घटना घडल्या आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला, पुरुषांचा एका गट बुरख्यातील महिला विद्यार्थिनीकडे जात घोषणाबाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यावर टीका देखील झाली. कमल हसन, रिचा चढ्ढा, स्वरा भास्कर, हेमा मालिनी आणि जावेद अख्तर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी याबाबत मत व्यक्त केले आहे.

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना शिंदेंच्या बाजूने...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis Nagpur :  नागपूरमध्ये फडणवीसांच्या घराबाहेर बॅनरबाजीAmit Shah - Vinod Tawde Meet: अमित शाह-विनोद तावडेंच्या भेटीची इनसाईड स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
आरारारा...खतरनाक... चेन्नईच्या वाघानं हार्दिकला फोडला घाम, एकाच ओव्हरमध्ये पांड्याची जोरदार धुलाई; तुफान फलंदाजी पाहाच!
Pune Crime : निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
निवडणूक संपताच पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय, भरदिवसा एकाला सपासप वार करुन संपवलं
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
विधानसभेचा निकाल लागताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला वेग, 50 पथकं ग्राऊंडवर, किती झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण
Maharashtra CM: अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने...
अमित शाहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना शिंदेंच्या बाजूने...
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
सिन्नरमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार पडल्याने गावकरी आक्रमक, खासदारांना गावबंदीचा फलक दाखवला, मविआतील धुसफूस समोर
Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
Embed widget