एक्स्प्लोर
19 जिल्ह्यात कर्जमाफीच्या अंमलबजावणीत ग्रामपंचायत निवडणुकांचा अडसर
तकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांचा समावेश होता. ग्रामपंचायत निवडणुकांमुळे सहकार विभागाने हा निर्णय घेतलाय. त्यामुळे या जिल्ह्यातील कर्जमाफी दोन महिने रखडणार आहे.
मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांची दुसरी यादी 19 जिल्ह्यात लागणार नाही. ग्रामपंचायत निवडणुकांमुळे सहकार विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील कर्जमाफी दोन महिने रखडणार आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जमाफी यादीपासून वंचित राहत असलेल्या 19 जिल्ह्यांना आचारसंहितेमधून वगळावं असा प्रस्ताव सरकारने निवडणूक आयोगापुढे ठेवला आहे.
राज्यतील जवळपास 19 जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक पार पडत आहे. त्यामुळे अचारसंहिता भंग होऊ नये याची काळजी राज्य सरकार घेत आहे. ग्रामपंचायत निवडणुका पार पडत असलेल्या जिल्ह्यांत शेतकरी कर्जमाफी यादी निवडणुका पार पडल्यानंतर जाहीर केली जाणार आहे. मात्र, या यादीमध्ये राज्यातील ठाणे, रायगड,रत्नागिरी, नंदुरबार, कोल्हापूरसह सुमारे 19 जिल्ह्यांचा समावेश असणार नाही.
ग्रामपंचायत निवडणुका असलेले जिल्हे
कोल्हापूर- 4, औरंगाबाद - 7, नांदेड - 100, अमरावती - 526, अकोला - 100, अमरावती - 526, अकोला - 1, यवतमाळ - 461, ठाणे - 13, रायगड - 1, रत्नागिरी-8, नाशिक - 102, जळगाव - 2, नगर - 2, नंदुरबार - 38, पुणे - 06, सातारा - 2
महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेची पहिली यादी 24 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही यादी जाहीर करण्यात आली होती. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांचा समावेश आहे. एप्रिल महिन्याअखेर या योजनेच्या अंमलबजावणीचं काम पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यातील 34 लाख 83 हजार 908 खात्याची माहिती संकलित केली. त्यापैकी 68 गावातली यादी जाहीर करण्यात आली होती. कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिलं जात आहे. जिल्हा पातळींवर कर्जमाफीचं काम सुरु झालं आहे.
कर्जमाफीसाठी एकूण 25 हजार कोटींची तरतूद
विधानसभेत आज 24 हजार 723 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. या पुरवणी मागण्यांमध्ये महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेसाठी 15 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील आठवड्यात आकस्मिक निधीतून 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. अशाप्रकारे एकूण 25 हजार कोटी रुपयांची तरतूद कर्जमाफीसाठी करण्यात आली. त्यावर आता 27 फेब्रुवारी आणि 2 मार्च रोजी यावर चर्चा होणार आहे.
Devendra Fadnavis | ठाकरे सरकारकडून वचनभंग; फडणवीसांचा सरकारवर घणाघात | ABP Majha
संबंधित बातम्या :
Farmers Loan Waiver | कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; शेतकरी म्हणतात...
Farmers Loan Waiver | शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement