एक्स्प्लोर

Farmers Loan Waiver | शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर झाली. एप्रिल अखेरपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांचा समावेश आहे.

मुंबई : महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही यादी जाहीर करण्यात आली. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांचा समावेश आहे. एप्रिल महिन्याअखेर या योजनेच्या अंमलबजावणीचं काम पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यातील 34 लाख 83 हजार 908 खात्याची माहिती संकलित केली. त्यापैकी 68 गावातली यादी जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिलं जात आहे. जिल्हा पातळींवर कर्जमाफीचं काम सुरु झालं आहे.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 24 फेब्रुवारी रोजी शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (23 फेब्रुवारी) सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, "दोन लाखापर्यंतच्या कर्जमुक्तीची उद्या (24 फेब्रुवारी) जाहीर होणारी यादी ही पहिली असेल, अंतिम नाही. अफाट काही तरी जाहीर करायचं आणि ते पेलत नाही म्हणून उताणं पडायचं, अशी आमची वृत्ती नाही. मागील सरकारमध्ये आम्हीही होतो. त्यावेळी त्यांनी जी कर्जमाफी योजना केली होती ती अजून सुरु होती. त्यामुळे आम्ही जे ठरवलं आहे ते नियोजित वेळेत पूर्ण करु."

Farmers Loan Waiver | ठाकरे सरकारची शेतकरी कर्जमाफीची वचनपूर्ती

कर्जमाफीसाठी एकूण 25 हजार कोटींची तरतूद विधानसभेत आज 24 हजार 723 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. या पुरवणी मागण्यांमध्ये महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेसाठी 15 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील आठवड्यात आकस्मिक निधीतून 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. अशाप्रकारे एकूण 25 हजार कोटी रुपयांची तरतूद कर्जमाफीसाठी करण्यात आली. त्यावर आता 27 फेब्रुवारी आणि 2 मार्च रोजी यावर चर्चा होणार आहे.

वर्ध्यातील शेतकऱ्यांकडून कर्जमाफीचं स्वागत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागू केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना  मिळाला आहे. या घोषणेमुळे शेतकरी वर्ग सुखावला असून ते सरकारचे आभार मानत आहेत.

शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

हिंगोलीतील शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त शेतकरी कर्जमाफी योजनेचा हिंगोलीतील समगा गावातून शुभारंभ झाला. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते आपले सरकार केंद्रावर पहिल्या शेतकऱ्याला कर्जमाफीची पावती देऊन सन्मान करण्यात आला. लाजी पुरभाजी कुरवडे असं जिल्हाधिकाऱ्यांनी सन्मान केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकऱ्यांनी कर्जमाफीबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.

शेतकरी कर्जमाफीत कोणताही गोंधळ होणार नाही : बच्चू कडू शेतकरी कर्जमाफीत कोणताही गोंधळ होणार नाही, असा विश्वास जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री  बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, "दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केली जाणार आहे. दोन टप्प्यांमध्ये त्याची अंमलबजावणी होणार आहे. या प्रक्रियेत कोणताही गोंधळ होणार नाही. सगळ्या गावांमध्ये आम्ही याबाबत प्रचार करणार आहोत."

महत्त्वाच्या बातम्या

आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
Cabinet Decisions : निवडून आलेल्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ, मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय
निवडून आलेल्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ, मंत्रिमंडळाचे सहा मोठे निर्णय
शिर्डी साईचरणी वर्षभरात भरभरुन दान; पण गतवर्षीच्या तुलनेत कमी, देवस्थानच्या एकूण ठेवी, सोनं-चांदी किती?
शिर्डी साईचरणी वर्षभरात भरभरुन दान; पण गतवर्षीच्या तुलनेत कमी, देवस्थानच्या एकूण ठेवी, सोनं-चांदी किती?
Pratap Sarnaik: 'ऑपरेशन टायगर सुरूच असतं, कोणाला त्यांच्या पक्षात आवडत नसेल तर आमचे दरवाजे कायम खुले'; मंत्री प्रताप सरनाईकांच सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
'ऑपरेशन टायगर सुरूच असतं, कोणाला त्यांच्या पक्षात आवडत नसेल तर आमचे दरवाजे कायम खुले'; मंत्री प्रताप सरनाईकांच सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Sanjay Raut Delhi: आई,साईबाबा तर कोणी मुलाची शपथ घेतली; खासदारांनी ठाकरेंना शब्द दिल्याचा दावा
TMC MP Merged With Small Party : आता छोटा पक्ष, नंतर मोठं लक्ष्य | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
Vidhan Parishad Election : आमचा निर्णय मतदानाच्या आधी होईल; शंभुराज देसाईंचं मोठं वक्तव्य, सांगली-सातारा निवडणुकीत महायुतीचा तिढा कायम?
आमचा निर्णय मतदानाच्या आधी होईल; शंभुराज देसाईंचं मोठं वक्तव्य, सांगली-सातारा निवडणुकीत महायुतीचा तिढा कायम?
Nagpur Crime News: प्लॉट खरेदीचा बहाणा, अश्लील व्हिडिओ, धर्मांतराचा दबाव; भेटायला बोलावून नको ते केलं अन्..., वायुसेना अधिकाऱ्याच्या पत्नीसोबतच्या 'त्या' घटनेने नागपूर हादरलं
प्लॉट खरेदीचा बहाणा, अश्लील व्हिडिओ, धर्मांतराचा दबाव; भेटायला बोलावून नको ते केलं अन्..., वायुसेना अधिकाऱ्याच्या पत्नीसोबतच्या 'त्या' घटनेने नागपूर हादरलं
शिर्डी साईचरणी वर्षभरात भरभरुन दान; पण गतवर्षीच्या तुलनेत कमी, देवस्थानच्या एकूण ठेवी, सोनं-चांदी किती?
शिर्डी साईचरणी वर्षभरात भरभरुन दान; पण गतवर्षीच्या तुलनेत कमी, देवस्थानच्या एकूण ठेवी, सोनं-चांदी किती?
Pratap Sarnaik: 'ऑपरेशन टायगर सुरूच असतं, कोणाला त्यांच्या पक्षात आवडत नसेल तर आमचे दरवाजे कायम खुले'; मंत्री प्रताप सरनाईकांच सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
'ऑपरेशन टायगर सुरूच असतं, कोणाला त्यांच्या पक्षात आवडत नसेल तर आमचे दरवाजे कायम खुले'; मंत्री प्रताप सरनाईकांच सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
धक्कादायक! खराब रस्त्यामुळे गावात रुग्णवाहिका पोहोचलीच नाही; प्रसुतींतर महिलेचा मृत्यू, ग्रामस्थांचा संताप
धक्कादायक! खराब रस्त्यामुळे गावात रुग्णवाहिका पोहोचलीच नाही; प्रसुतींतर महिलेचा मृत्यू, ग्रामस्थांचा संताप
Chandrapur Congress: धानोरकर गटातील सर्व 16 नगरसेवकांना अपात्र घोषित करा; काँग्रेस गटनेते राजेश अडुर यांची आयुक्तांकडे मागणी, चंद्रपूर महापालिकेतील गटनेते पदाचा वादाचा नवा अंक!
धानोरकर गटातील सर्व 16 नगरसेवकांना अपात्र घोषित करा; काँग्रेस गटनेते राजेश अडुर यांची आयुक्तांकडे मागणी, चंद्रपूर महापालिकेतील गटनेते पदाचा वादाचा नवा अंक!
Sanchita Ugale Co Star Ujjawal Sharma: लिव्ह-इनमध्ये होती संचिता उगले? को-अॅक्टरनं कुणालाही माहीत नव्हतं 'ते' सांगितलं, म्हणाला, 'ती Ex मुळे टेन्शनमध्ये होती...'
लिव्ह-इनमध्ये होती संचिता उगले? को-अॅक्टरनं कुणालाही माहीत नव्हतं 'ते' सांगितलं, म्हणाला, 'ती Ex मुळे टेन्शनमध्ये होती...'
Embed widget