एक्स्प्लोर
गोंदियात गारपिटीच्या माऱ्याने 460 पोपटांनी प्राण गमावले
लिंबाच्या आकाराएवढ्या गारांच्या माऱ्यामुळे झाडावरील बहुतांश पोपट जखमी झाले. त्यापैकी 460 पोपटांचा दुर्दैवी अंत झाला.
गोंदिया : भंडारा जिल्ह्यात गारांसह अवकाळी पाऊस झाल्यामुळे 460 पोपटांना जीव गमवावा लागला. तुमसर तालुक्यातील शिव मंदिराजवळ काल रात्री ही घटना घडली.
गेल्या अनेक वर्षांपासून तुमसर शहरातील शिव मंदिराजवळ पिंपळाच्या झाडांवर हजारो पोपटांचं वास्तव्य होतं. वर्षानुवर्ष या पोपटांनी अनेक उन्हाळे-पावसाळे झेलले. अधूनमधून झालेल्या गारपिटांनाही त्यांनी खंबीरपणे तोंड दिलं, मात्र गुरुवारची तूफान गारपीट त्यांच्यासाठी कर्दनकाळ ठरली.
लिंबाच्या आकाराएवढ्या गारांच्या माऱ्यामुळे झाडावरील बहुतांश पोपट जखमी झाले. त्यापैकी 460 पोपटांचा दुर्दैवी अंत झाला. या सर्व पोपटांचे मृतदेह वन विभागामार्फत जमिनीत पुरण्यात आले आहेत. इतक्या मोठया प्रमाणात पोपटांचे मृत्यू झाल्यामुळे परिसरातील नागरिक आणि वन्यजीव प्रेमींनी निराशा व्यक्त केली आहे.
गेल्या दोन दिवसात पूर्व आणि पश्चिम विदर्भात गारपिटीमुळे मोठं नुकसान झाले आहे. काल रात्रीच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यातील गोरगांव तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाला. गोरेगाव तालुक्यातील कुराडी, खाडीपार, मुंडीपार, मंगेझरी या गावात मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाला असून अनेक ठिकाणी गारांचे थर जमा झाले.
रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या गारपिटीमुळे अनेक घरांचं नुकसान झालं आहे. शेतात पीक नसलं तरीही बाहेर ठेवलेल्या धान्याचं नुकसान झालं आहे. गारपिटीचा फटका जनावरं आणि परदेशी पक्ष्यांनाही बसला. अनेक पक्षी आणि जनावरं जखमी झाले आहेत.
या नुकसानाबाबत गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले आणि जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी शेतात पाहणी करत तहसीलदारांना पंचनामा करुन लवकर नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement