एक्स्प्लोर

Goa Election Result 2022 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना तीन अपक्षांचा पाठिंबा जाहीर, जाणून घ्या कोण आहेत ते..

Goa Election Result 2022 : प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना तीन अपक्षांचा पाठिंबा जाहीर केला आहे. कोण आहेत ते? 

Goa Election Result 2022 :  गोवा विधानसभा निवडणुकीत  (Goa Assembly Election Result 2022) भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. गोवा भाजपने आज संध्याकाळी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याचे सांगितले आहे. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना तीन अपक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. कोण आहेत ते? 

तीन अपक्षांना पाठिंबा जाहीर, कोण आहेत ते? 
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) साखळी मतदारसंघात प्रमोद सावंत 500 मतांनी विजयी झाले. सुरुवातीच्या कलांमध्ये प्रमोद सावंत पिछाडीवर होते, परंतु त्यांनी जोरदार मुसंडी मारुन विजय मिळवला. विजयानंतर सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अँटोनियो वास, चंद्रकांत शेट्ये आणि अॅलेक्स रेजिनाल्ड या तीन अपक्षांचा पाठिंबा जाहीर करून बहुमताचा दावा केला आहे. गोव्यातील 40 जागांवर आत्तापर्यंत भाजप 19 जागांवर (+6) आघाडीवर आहे. काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर असून आठ जागांचे नुकसान झाले आहे. तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष प्रत्येकी तीन जागांवर आघाडीवर आहेत, तर इतर तीन जागांवर आघाडीवर आहेत. सावंत यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत या निवडणुकीत जनतेने भाजपवर विश्वास ठेवल्याबद्दल जनतेचे आभार मानले.

Goa Election Result 2022 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना तीन अपक्षांचा पाठिंबा जाहीर, जाणून घ्या कोण आहेत ते..

2017 च्या निवडणुकीपेक्षा चांगली कामगिरी 

भाजपबद्दल बोलायचे झाले तर 2017 च्या निवडणुकीपेक्षा यावेळी पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत, काँग्रेसने गोव्यात 40 पैकी 17 जागा जिंकल्या होत्या आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता, परंतु 13 जागा जिंकूनही, भाजपने लहान पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करण्यात यश मिळवले.

अपक्षांना आम्ही सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार

माझ्या विजयांचं श्रेय माझ्या कार्यकर्त्यांना, पार्टीला जातं. मी नसतानाही त्यांनी काम केलं. गोव्याच्या विकासासाठी जनतेचा कौल पुन्हा भाजपाला मिळाला आहे.  विजयानंतर अपक्षांना आम्ही सोबत घेऊन सरकार स्थापन करणार अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रमोद सावंत यांनी दिली आहे.  एक्झिट पोलमध्ये दाखवलेल्या अंदाजानंतर प्रमोद सावंत काल म्हणाले होते की, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की गोव्यात भाजप पुन्हा बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. 10 मार्चला निकाल भाजपच्या बाजूने येईल असा विश्वास यावेळी सावंत यांनी व्यक्त केला आहे. यावेळी भाजपची काँग्रेसशी थेट स्पर्धा आहे. काँग्रेसच्या मनात नेहमीच भीती असते. यावेळी त्यांनी ज्याप्रकारचे उमेदवार निवडले आहेत, ते पाहता कुठेतरी त्यांना असे वाटले असेल की, ते पुन्हा पळून जाऊ नये असा टोलाही सावंत यांनी लगावला. दरम्यान, याआधी प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली होती. याबाबत त्यांनी ट्विटही केले आहे. ज्यामध्ये सावंत म्हणाले की, गोव्यात भाजपच्या दमदार कामगिरीची माहिती पंतप्रधान मोदींना देण्यात आली आहे. त्यामुळे जनतेच्या आशीर्वादाने गोव्यात पुन्हा सरकार स्थापन करण्याची संधी मिळेल. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही लोकांच्या हितासाठी काम करत राहू असेही सावंत यांनी सांगितले.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

UP Election Result 2022 Live Updates : उत्तर प्रदेशात भाजप सत्ता राखणार? निवडणुकांचे अचूक अपडेट्स फक्त एका क्लिकवर...

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget