Goa Election Result 2022 Live Updates : गोव्यातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस
Goa Election Results 2022 Live Updates : भाजप सत्ता कायम राखणार की, काँग्रेस सत्तेत येणार? विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर गोव्यात मुख्यमंत्री कुणाचा? अचूक निकाल पाहा एबीपी माझावर...
LIVE
Background
Goa Election Results 2022 Live Updates : आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल (Election Result 2022) जाहीर होणार आहे. मतदारांनी कोणाच्या पारड्यात जनमताचा कौल दिला ते स्पष्ट होणार आहे. दरम्यान, गोव्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात जोरदार सामना रंगल्याचे चित्र एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. दोघांमध्ये मोठी स्पर्धा असून, भाजप सत्ता कायम रखणार की, काँग्रेस सत्तेत येणार हे सांगता येत नाही. मात्र कॉंग्रेस आणि भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावली असल्यानं आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर गोव्यात मुख्यमंत्री कुणाचा? या विषयी राजकीय वर्तुळात औत्सुक्य निर्माण झाले आहे.
मुख्य लढत जरी काँग्रेस-भाजपमध्ये होत असली तरी उत्पल पर्रीकरांसह अनेक अपक्षांनी देखील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढवली आहे. सोबतच शिवसेना देखील या निवडणुकीत जोमाने उतरलेली पाहायला मिळाली
गोव्यात कुणाची प्रतिष्ठा पणाला?
प्रमोद सावंत (भाजप) - साखळी
डॉ. प्रमोद सावंत हे व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. प्रमोद सावंत हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती आहेत. ते यापूर्वी कधीही मंत्री झाले नाहीत. परंतु 2019 साली गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर भाजप नेते आणि गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत विराजमान झाले.
दिगंबर कामत (काँग्रेस) - मडगाव
मनोहर आजगावकर (भाजप) - मडगाव
अमित पालेकर (आप) - सांताक्रूझ
मायकल लोबो (काँग्रेस) - कळंगुट
उत्पल पर्रिकर (अपक्ष) - पणजी
उत्पल पर्रिकर हे भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र आहेत. पणजीतून उत्पल पर्रिकर अपक्ष म्हणून उभे राहिले आहेत.
बाबूश मोन्सेरात (भाजप) - पणजी
Goa Election Result 2022 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत साखळी मतदारसंघात 500 मतांनी विजयी
Goa Election Result 2022 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) साखळी मतदारसंघात प्रमोद सावंत 500 मतांनी विजयी झाले. गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election Result 2022) भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. गोवा भाजपने आज संध्याकाळी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना तीन अपक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीने देखील भाजपला पाठिंबा दर्शविला आहे.
Goa Election Result 2022 : उत्तर गोव्यात भाजपची 10 जागांवर आघाडी
Goa Election Result 2022 : उत्तर गोव्यातील 19 जागांपैकी 10 जागा भाजपच्या उमेदवारांनी जिंकल्या आहेत. यासंदर्भात उत्तर गोव्याचे जिल्हाधिकरी अजित रॉय यांनी माहिती दिली आहे.
Goa Election Result 2022 : देवेंद्र फडणवीस यांची जादू पुन्हा एकदा
गोव्यात भाजपचा विजय झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा पुन्हा एकदा चाललाय हे स्पष्ट झालं आहे. गोव्याची जबाबदारी स्वीकारताना उमेदवारांची निवड, अन्य पक्षांतून पक्षात घेतलेले उमेदवार, विविध नेत्यांचे पक्षप्रवेश अशा सार्या बाबींवर त्यांनी व्यक्तिश: लक्ष ठेवले आणि बहुतेक कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत झाले. केवळ उमेदवारांची निवड नाही, तर प्रत्येक मतदारसंघातील प्रचाराची धुराही त्यांनी खांद्यावर घेतली.
Goa Election Result 2022 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना तीन अपक्षांचा पाठिंबा जाहीर
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) साखळी मतदारसंघात प्रमोद सावंत 500 मतांनी विजयी झाले. सुरुवातीच्या कलांमध्ये प्रमोद सावंत पिछाडीवर होते, परंतु त्यांनी जोरदार मुसंडी मारुन विजय मिळवला. विजयानंतर सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अँटोनियो वास, चंद्रकांत शेट्ये आणि अॅलेक्स रेजिनाल्ड या तीन अपक्षांचा पाठिंबा जाहीर करून बहुमताचा दावा केला आहे.
Goa Election Results 2022: सत्ता स्थापनेसाठी तीन अपक्षांचा भाजपला पाठिंबा
Goa Election Results 2022: डॉ. चंद्रकांत शेट्ये (डिचोली मतदारसंघ), अँटोनियो वास (कुठ्ठाळी मतदारसंघ), अलेक्सो लॉरेन्को (कुडतरी मतदारसंघ) या तीन अपक्ष विजयी उमेदवारांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा दिला आहे. गोव्यात सत्ता स्थापनेसाठी 21 ही मॅजिक फिगर आहे. त्यामुळे अपक्षांच्या साथीने गोव्यात सत्ता स्थापन करण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, अपक्षांसह मगोपच्या विजयी आमदारांना सोबत घेऊन काठावरचं नाही तर पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन करण्याचा भाजपचा इरादा आहे. गोव्यात भाजप 19, काँग्रेस १२, मगोप+ 3, आप 02, इतर 04 जागांनी आघाडीवर आहे.