
Ranjit Singh Disale Scholarships | 'ग्लोबल टीचर' म्हणून नावाजलेल्या रणजितसिंह डिसले गुरुजी यांच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या आणि ओघाओघाने भारत देशाच्याही शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे

नवी दिल्ली : ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या आणि ओघाओघाने भारत देशाच्याही शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. डिसले गुरुजी यांच्या नावाने इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप अर्थात शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.
कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप या नावाने 400 युरोंची ही शिष्यवृत्ती इटलीतील सॅमनिटे राज्यातील 10 विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. विद्यापीठस्तरावरील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. यासाठी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत. बेनव्हेंटोचे महापौर, कॅम्पानिया प्रांताचे शिक्षण अधिकारी या मुलांची निवड करणार असून, पुढील 10 वर्षे 100 मुलांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
Teacher wins Global Prize: ग्लोबल टिचर्स पुरस्काराने सन्मानित झालेल्या रणजीतसिंह डिसले यांचं कार्य
ग्लोबल टीचर पुरस्कार 2020 चे विजेते रणजितसिंह डिसले यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्कार रक्कमेतील तब्बल साडेतीन कोटींची रक्कम 9 देशातील शिक्षकांना वाटून दिली होती. इटलीचे कार्लो मझुने हे त्यापैकी एक. शिक्षण क्षेत्रातील त्यांचं हे आणखी मोठं आणि महत्त्वपूर्ण योगदान ठरत आहे.
Majha Katta | ग्लोबल टिचर्स पुरस्काराने सन्मानित झालेले रणजीतसिंह डिसले गुरुजी 'माझा' कट्ट्यावर!
डिसले गुरुजींना मिळाला होता 7 कोटी रुपयांचा मानाच पुरस्कार
युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर प्राईज' आज जाहीर झाला. यात सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार आज जाहीर झाला होता. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली होती. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले होते.
पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले होते. यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल, असा त्यांचा मानस होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
