Teacher wins Global Prize: ग्लोबल टिचर्स पुरस्काराने सन्मानित झालेल्या रणजीतसिंह डिसले यांचं कार्य
पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल.
सोलापूर : माझा झालेला हा सन्मान केवळ माझा नसून राज्यातील आणि देशातील सर्व शिक्षकांचा आहे. सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा हा सन्मान आहे. वार्की फाऊंडेशनचे मी मन:पूर्वक आभार मानतो. माझ्या कामात सहकार्य केल्याबद्दल राज्य सरकारचेही आभार, असं रणजीत डिसले यांनी म्हटलं. पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडकरता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवनवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल, असंही डिसले यांनी म्हटलं.
ग्लोबल टिचर्स पुरस्कार नेमका आहे काय?
यात जगातील सर्वोत्तम 50 शिक्षकांची याकरता निवड करण्यात आली आहे. लंडन येथील वार्की फाऊंडेशनच्या वतीने 10 लाख अमेरिकन डॉलर्सचा हा पुरस्कार आहे. लंडन येथील ग्लोबल एज्युकेशन अँड स्किल फोरम या कार्यक्रमात हा पुरस्कार रणजीत डिसले यांना प्रदान करण्यात आला.