एक्स्प्लोर

मुंबईतल्या कुलाब्यातून 4 अफगाणी घुसखोरांना अटक, चारही जण अट्टल चोर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घुसखोरांच्या विरोधात मोर्चा काढल्यानंतर पोलिसांकडून घुसकोरांच्या विरोधात मोठ्या कारावया करण्यात आल्या आहेत. पालघर, ठाणे, नवी मुंबईनंतर आता मुंबई शहरात सुद्धा घुसखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईतल्या डी.बी.मार्ग पोलिसांकडून 4 अफगाणी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेले चारही आरोपी अट्टल चोर असल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी या घुसखोरांकडून 50 चोरीचे मोबाईल, 10 लॅपटॉप जप्त केले आहेत. मुंबई शहरातल्या पायधुनी पोलीस ठाण्यात आणि दिल्लीच्या करोलबागमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वास्तव्य करून मोठ्या प्रमाणात चोरी करत असल्याचं तपासात उघडकीस आलं आहे. कुलब्यातल्या बिस्टोरीया हॉटेलमध्ये टाकलेल्या धाडीत त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घुसखोरांच्या विरोधात मोर्चा काढल्यानंतर पोलिसांकडून घुसकोरांच्या विरोधात मोठ्या कारावया करण्यात आल्या आहेत. पालघर, ठाणे, नवी मुंबईनंतर आता मुंबई शहरात सुद्धा घुसखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. मनसेनं छापेमारी केल्यानंतर मुंबईची वेस असलेल्या दहीसरमधून पाच संशयित बांग्लादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात आलं आहे. संशयितांनी अशोकवन देसाईवाडीमध्ये बांगड्यांचा कारखाना थाटला होता. आधार कार्ड केंद्रावर 4 नोटा सरकवून अशा किती घुसखोरांनी भारताचं नागरिकत्त्व मिळवलं आहे. हे घुसखोर भारतात येऊन पोटपाण्यासाठी गुन्हेगारी कारवाया करत असल्याचं उघड झालं आहे. Raj Thackeray Uncut Speech | घुसखोरांची साफसफाई आता झालीच पाहिजे : राज ठाकरे ठाण्यातील पाटली पाडा विभागातील किंग काँग नगर इथे मनसेने काही बांगलादेशी कुटुंबे पकडली आहेत. त्यापैकी एक महिला आपल्या पतीशिवाय मुलांना घेऊन राहते कारण तिचा पती काही वर्षापूर्वी तिला इथे सोडून बांगलादेशला निघून गेला आहे. तर दुसरी लग्न करून भारतात आली आहे, तिला देखील दोन मुले आहेत. धक्कादायक म्हणजे दोन्ही महिलांकडे आधारकार्ड, पॅन कार्ड इतकेच नाही तर वोटिंग कार्ड देखील आहेत. ते देखील कागदपत्रे नसताना. त्यामुळे ते भारतीय असल्याचा पूर्ण पुरावा त्यांच्याकडे आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रवींद्र मोरे आणि इतर कार्यकर्त्यांनी धाड टाकून या बांगलादेशींना पकडले असून याच विभागात अजून 50 कुटुंबे असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. ही कुटुंबे आजूबाजूच्या घरात धुणी भांडी करून, बिल्डिंगच्या साईटवर काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात असे त्यांनी सांगितले आहे. संबंधित बातम्या :  भूमिका बदलून काहीजण सत्तेत बसले, राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला; तर औरंगाबादच्या नामांतरालाही पाठिंबा ... जेव्हा मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे स्वतः 'आर्म बँड' बांधतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget