एक्स्प्लोर

Exclusive : धक्कादायक...! पालघरच्या मोखाड्यात मुलाच्या कफनासाठी वेठबिगारी, जाचाला कंटाळून मजुरानं जीवन संपवलं

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देखील आदिवासी कातकरी शेत मजुराचा वेठबिगारीच्या पाशात अडकून बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पालघर :  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देखील आदिवासी कातकरी शेत मजुराचा वेठबिगारीच्या पाशात अडकून बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा या दुर्गम तालुक्यात एका मजुराला त्याच्या मुलाच्या कफनासाठी वेठबिगारी करण्याची वेळ ओढवली. काळू पवार (48) असे या दुर्दैवी कातकरी शेत मजुराचे नाव आहे. माहितीनुसार त्याने मुलाच्या अंत्यसंस्कारला कफन घेण्यासाठी  रामदास कोरडे या  मालकाकडून 500 रुपये उसने घेतले होते. ते पैसे  फेडण्यासाठी रामदास कोरडेने काळूला गडी म्हणून राबवून पिळवणूक करत असल्यानेच कंटाळून अखेर त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप त्याची पत्नी सावित्री पवार हिने आपल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी मालक रामदास अंबु कोरडे याच्या विरोधात मोखाडा पोलिस ठाण्यात "बंधबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम १९७६" अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राज्य स्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष तथा, श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या मोखाडा तालुक्यातील कातकरी वाड्यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान ही घटना उघडकीस आली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देखील कातकरी शेतमजुराला मुलाच्या कफनासाठी वेठबिगारी करावी लागली आणि वेठबिगारीच्या पाशात अडकून आत्महत्या करावी लागते ही अत्यंत गंभीर व वेदनादायी आणि व्यवस्थेबाबत चीड आणणारी घटना आहे असे म्हणत पंडित यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. अशा घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता तातडीने कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचेही पंडित यांनी म्हटले आहे. 

मोखाडा तालुक्यातील आसे गावात काळू पवार व पत्नी सावित्री, थोरली मुलगी धनश्री, धाकटी मुलगी दुर्गा हे कातकरी कुटुंब शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. 2020 च्या दिवाळी सणाच्या 5 दिवस अगोदर त्यांचा सर्वात छोटा मुलगा दत्तू याचा मृतदेह एका खोल दरीत आढळला होता. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे त्यांना काहीच कळले नाही. परंतु, आपल्या पोटच्या गोळ्याचे अंतिम संस्कार करण्यासाठीही पवार कुटुंबियांकडे पैसे नव्हते. शेवटी गावातील रामदास कोरडे या मालकाकडून कफन खरेदीसाठी 500 रुपयाची उसनवारी करावी लागली, त्यावेळी हे पैसे कसे फेडायचे याबाबत विचारले असता शेतीच्या कामावर येऊन फेडावे लागतील असे मालकाने सांगितल्याचे व त्याप्रमाणे तो गडी  म्हणून काम करत होता असे मृत काळूच्या पत्नीने आपल्या तक्रारी दरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. 

मुलाच्या कफनासाठी घेतलेल्या पैशाची परतफेड करण्यासाठी काळू मालकाकडे गडी म्हणून राबत होता. शेती नांगरणे, गुरे हाकणे अशी कामं तो करत असे. परंतु नेहमी मालकाकडून त्याला मारहाण तसेच शिवीगाळ होत असे. आत्महत्येच्या दोन दिवस अगोदर तब्येत ठीक नसल्यामुळे काळू कामावर गेला नाही. म्हणून मालक रामदास याने त्याला मारहाण केली होती, त्यामुळे बाबा प्रचंड तणावात असल्याचे थोरली मुलगी धनश्री सांगते.   

त्यामुळे मालक रामदास कोरडे याच्या जाचाला कंटाळून दिनांक 12 जुलै 2021 रोजी सकाळी काळू याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा पवार कुटुंबीयांचा आरोप आहे. प्रकरणी मोखाडा पोलिसांनी मालक रामदास अंबु कोरडे याच्या विरोधात  "बंधबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम 1976 " अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात केला आहे. श्रमजीवी संघटनेने या प्रकरणी सतत पाठपुरावा केल्यामुळे अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी मालक रामदास अंबु कोरडे हा देखील आदिवासी आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Embed widget