एक्स्प्लोर

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किमती नियंत्रित करून 1500 पर्यंत कमी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या हालचाली

कोरोना  रुग्णांवरील उपचारासाठी बऱ्याच औषधांचा वापर होत असून प्रामुख्याने रेमडेसिवीर इंजेक्शन हे औषध या आजारावर प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. राज्यात जानेवारी 2021 अखेर पर्यंत कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय कमी झाल्याचे दिसून आले.

मुंबई : राज्यात  फेब्रुवारीच्या  मध्यापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढत असून दर दिवशी सुमारे 10,ooo नवीन रुग्ण वाढत आहेत. आज  राज्यात 98, 859  सक्रिय रुग्ण आहेत. सध्याची परिस्थिती बघता राज्यात  जर ही परिस्थिती कायम राहिली तर  दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारत येत नाही. 

कोरोना  रुग्णांवरील उपचारासाठी बऱ्याच औषधांचा वापर होत असून प्रामुख्याने रेमडेसिवीर इंजेक्शन हे औषध या आजारावर प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. राज्यात जानेवारी 2021 अखेर पर्यंत कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय कमी झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी देखील कमी झाल्याचे दिसून आले. फेब्रुवारी 2021 पासून रुग्णालये व रुगणालयांना पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांना या औषधाची विक्री किंमत कमी करण्यात आली परंतु छापील विक्री किंमत कमी करण्यात आली नाही. त्यामुळे  सदर विक्री किंमत कमी करण्यात आलेल्या किमतीचा लाभ रुग्णांना न मिळता त्यांचेवर   छापील विक्री किमतीनुसार आकारणी होत असल्याने ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड पडत असल्याचे दिसून आले.

याबाबत डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले.  दिलेल्या सूचनेनुसार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादकांनी सदर औषधाची विक्री रुग्णालयांना तसेच रुगणालयांना पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांना सुमारे 800 ते 1300 रुपयांनी म्हणजे सरासरी 1040 रुपये किंमतीत केल्याचे आढळून आले. तथापी याबबत रुग्णालयांनी रुग्णांना आकारलेल्या किंमतीबाबत पडताळणी केली असता काही रुग्णालये त्यांच्या खरेदी किमतीवर  10 ते 30 % अधिक रक्कम आकारून छापील किमतीपेक्षा कमी किमतीत रुग्णास उपलब्ध करीत असल्याचे  परंतु बहुतांश रुग्णालये खरेदी किंमत कमी असूनदेखील  छापील किंमत आकारून मोठ्या प्रमाणावर नफा कमावत असल्याचे दिसून आले आहे. 

त्यामुळे रेमेडिसिवीर इंजेक्शनची उत्पादकांची विक्री किंमत व प्रत्याक्षात रुग्णांना आकारण्यात येणारी किंमत यामधील तफावत कमी करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरवात केली. बहुतांश रुग्णालये खरेदी किंमत कमी असूनदेखील  रुग्णांना छापील किंमत आकारत असल्याचे दिसून आले आहे. याबाबतचा प्रशासनाने शासनास  सविस्तर अहवाल सादर केला असून शासनाने रुग्णालयांना सदर रेमेडिसिवीर इंजेक्शनच्या खरेदी किंमतीवर जास्तीत जास्त 30% जास्त किंमत आकारण्याबाबत निर्देश देण्याबाबत प्रस्तावित करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates : गोकुळ दुधाच्या विक्री दरात वाढ होण्याची शक्यता; नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत होणार निर्णय
Maharashtra Live blog updates : गोकुळ दुधाच्या विक्री दरात वाढ होण्याची शक्यता; नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत होणार निर्णय
Sanjay Shirsat: मोठी बातमी! मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, मद्यधुंद तरुणांनी घरासमोर येऊन दारूच्या बाटल्या फोडल्या अन्...; मध्यरात्री नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, मद्यधुंद तरुणांनी घरासमोर येऊन दारूच्या बाटल्या फोडल्या अन्...; मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Akola News: अकोलेकरांची पाण्याची चिंता मिटवण्यासाठी 132 कोटींचा प्लॅन! मोर्णा धरणातून 25.20 किलोमीटर जलवाहिनीला प्रशासकीय मान्यता; तीन महिन्यांत पूर्ण करण्याचं नियोजन
अकोलेकरांची पाण्याची चिंता मिटवण्यासाठी 132 कोटींचा प्लॅन! मोर्णा धरणातून 25.20 किलोमीटर जलवाहिनीला प्रशासकीय मान्यता; तीन महिन्यांत पूर्ण करण्याचं नियोजन
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
Satej Patil and Hasan Mushrif: हसन मुश्रीफ म्हणाले, रागाच्या भरात चूक झाली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले....
हसन मुश्रीफ म्हणाले, रागाच्या भरात चूक झाली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले....
Embed widget