एक्स्प्लोर
सीबील स्कोर बाबत रिझर्व्ह बँकेचे हे 6 नवीन नियम जाणून घ्या !
क्रेडिट स्कोअरबाबत रिझर्व्ह बँकेकडे अनेक तक्रारी येत असल्याने RBI ने CIBIL Score बाबत 6 नवीन नियम केले आहेत. ज्याचा थेट फायदा कस्टमरला होणार आहे. जाणून घेऊयात या नियमांबद्दल माहिती.

CIBIL SCORE | CREDIT SCORE
1/6

CIBIL दर 15 दिवसांनी अपडेट होणार म्हणजेच आत महिन्यातून दोन वेळेस.
2/6

CIBIL तपासण्यासाठी ग्राहकाला माहिती पाठवावी लागणार. ही माहिती एसएमएस किंवा ईमेलद्वारे पाठविली जाऊ शकते.
3/6

ग्राहकाची कोणतीही विनंती नाकारली गेली तर त्याला त्याचे कारण सांगणे आवश्यक आहे. यामुळे ग्राहकाला त्याची विनंती का नाकारली गेली हे समजणे सोपे होईल.
4/6

वर्षातून एकदा ग्राहकांना मोफत क्रेडिट रिपोर्ट तपासता येणार.
5/6

ग्राहक डिफॉल्ट होणार असेल तर डिफॉल्टची तक्रार करण्यापूर्वी ग्राहकाला एसएमएस किंवा ईमेलद्वारे माहिती देणे आवश्यक असेल.
6/6

जर क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीने ग्राहकांच्या तक्रारीचे 30 दिवसांत निराकरण केले नाही, तर त्यांना प्रतिदिन 100 रुपये दंड भरावा लागेल.
Published at : 03 Dec 2024 12:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion