एक्स्प्लोर

कोणाच्या गाडीवर लाल दिवा बसणार? शिंदेसेना-भाजप की दोन्हीही? धाराशिवमध्ये या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी चर्चेत

शिंदेसेनेकडे सध्या सावंत हेच एकमेव आमदार जिल्ह्यातून आहेत. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचेही ते निकटचे सहकारी म्हणून गणले जाणारे राणा जगजीतसिंह पाटील आहेत.

Dharashiv: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आमदारांच्या मुंबईत चकरा वाढल्या आहेत.  मुंबईत  आता राज्यात मराठवाड‌्यात कोणत्या आमदारांना मंत्रीपदाची ऑफर महायुती सरकार देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. दरम्यान, धाराशिवमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत महायुतीचं संख्याबळ एका आमदारानं घटलं आहे. यावेळी उमरग्याची जागा हातून गेल्याने महायुतीला दोन जागांवरच यश मिळालं. या दोन्ही जागेवरील विजयी उमेदवार हे मंत्रिपदाच्या रेसमध्ये असून, कोणाच्या गाडीवर लाल दिवा लागणार याची सध्या एकच चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे. एकीकडे शिवसेनाफुटीनंतर शिंदे गटाचे तानाजी सावंत कॅबिनेटमध्ये गेले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना पुन्हा नामदार करण्याचे जाहीर आश्वासन सभेतून दिले होते.  तर दुसरीकडे विधानपरिषदेची एक व विधानसभेची तिसरी टर्म पदरी पडलेले आमदार राणाजगजितसिंह पाटील हे ही तगडे स्पर्धक आहेत. ते भाजपकडून निवडून आले असून, धाराशिवमध्ये दुसऱ्यांदा भाजपचे कमळ फुलवले आहे. त्यामुळे एकाच जिल्ह्यात शिंदे गटाच्या आमदाराला मंत्रीपद मिळणार, भाजपच्या आमदाराला मंत्रीपद देणार की दोघांच्या गाड्यांवर लाल दिवा बसणार याची चर्चा रंगली आहे.

मागच्या विधानसभा निवडणुकीत धाराशिवमध्ये चारही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जिंकले होते. मात्र, महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर एकाही आमदाराच्या पदरात मंत्रीपद पडू शकले नाही. दरम्यान, शिवसेनेत फुट पडल्यानंतर स्थापन झालेल्या महायुतीत  तानाजी सावंत कॅबिनेट मंत्री झाले. निकालात शिंदेसेनेच्या हातून उमरग्याची जागा निसटली. उस्मानाबादेतही पराभव झाला. परंड्यात सावंत हे काठावर पास झाले. त्यामुळे शिंदेसेनेकडे सध्या सावंत हेच एकमेव आमदार जिल्ह्यातून आहेत. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचेही ते निकटचे सहकारी म्हणून गणले जाणारे राणा जगजीतसिंह पाटील आहेत.  त्यामुळे मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दोन्ही आमदारांना मताध्यक्य किती?

राणाजगजितसिंह पाटील

मतदारसंघ: तुळजापूर

मिळालेली एकूण मते : १,३१,८६३

मताधिक्य : ३६,८७९

तानाजी सावंत

मतदारसंघ : परंडा

मिळालेली एकूण मते : १,०३,२५४

मताधिक्य: १,५०९

या बाजू ठरणार अडचणीच्या ?

तानाजी सावंत यांचा बेधडक स्वभाव, मागच्या टर्ममध्ये मंत्री असताना झालेले त्यांच्यावर झालेले आरोप, पालकमंत्री असतानाही जिल्ह्यातील इतर दोन उमेदवारांसाठी अपुरे पडलेले बळ, मित्रपक्षांकडून होणारा सुप्त विरोध या बाजू सावंत यांच्यासाठी अडचणीच्या असल्याचे सांगितले जात आहे. तर राणाजगजितसिंह पाटील यांच्या पक्षात मंत्रिपदासाठी असलेली इच्छुकांची गर्दी, मतदारसंघाच्या लगतच्याच निलंगा, औसा, लातूर ग्रामीणमधील भाजपच्या आमदारांचा मंत्रिपदासाठी असणारा आग्रह, या बाजू अडचणीच्या ठरू शकतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Budget 2025 | Mahayuti PC | एकनाथ शिंदेंकडून पुन्हा खुर्ची चर्चेत, शिंदेंच्या मनातून जाईना- अजित पवारBudget Superfast | अर्थ बजेटचा | अजित पवारांनी सादर केलेल्या बजेटमधून  सर्वसामान्य जनतेसाठी नेमकं काय?Sandeep Kshirsagar News | ज्यांनी मारहाण केली ती माझी माणसं नाहीत, संदीप क्षीरसागर यांचं स्पष्टीकरणABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6 PM 10 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Satish Bhosale Khokya Bhai : खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
खोक्या भाईनंतर त्याच्या साडूचा प्रताप समोर, एक कोटीची मागितली खंडणी, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल
Maharashtra Budget 2025 : अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
अजित पवार अन् उद्धव ठाकरे भेट; दादा हा अर्थसंकल्प तुमचा नाही, उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला
शिवसेना नेत्यानं हडप केलेला गाळा परत मिळाला; हाती कुलूप येताच मराठमोळ्या वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू
शिवसेना नेत्यानं हडप केलेला गाळा परत मिळाला; हाती कुलूप येताच मराठमोळ्या वृद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू
BMC : कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
कंत्राटी 580 सफाई कामगारांना मुंबई महानगर पालिकेत कायम करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Embed widget