एक्स्प्लोर

Eknath Shinde: मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा

Eknath Shinde: मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची घालमेल सुरू झाली आहे. मंत्रीपदासाठी त्यांनी आता प्रयत्न सुरू केले आहेत. महायुतीतील भाजप सोडून इतर पक्षातील नेते देखील देवेंद्र फडणवीसांची यासाठी भेट घेत असल्याच्या चर्चा आहेत.

मुंबई: विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने मोठं यश मिळवलं आहे. त्यानंतर आता राज्यात मुख्यमंत्री आणि मंत्रीपदाच्या शपथविधीची मोठी तयारी सुरू झाली आहे. अशातच आता मंत्रीपद आणि मुख्यमंत्री पदावरून अद्याप महायुतीमध्ये पेच निर्माण झाल्याचं दिसून येत आहेत. एकीकडे महायुतीतील नेत्यांमध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत आहेत, तर दुसरीकडे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ताप आणि घशाला संसर्ग झाल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांनी सर्व बैठका, भेटीगाठी रद्द केल्या आहेत, अशातच मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची घालमेल सुरू झाली आहे. मंत्रीपदासाठी त्यांनी आता प्रयत्न सुरू केले आहेत. महायुतीतील भाजप सोडून इतर पक्षातील नेते देखील देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) यासाठी भेट घेत असल्याच्या चर्चा आहेत.

एकनाथ शिंदे ठाण्यात तर अजित पवार दिल्लीत

दोन-तीन दिवस आपल्या मुळगावी दरे येथे गेलेले राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे रविवारी ठाण्यातील निवासस्थानी परतले. मात्र, अद्याप एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांची प्रकृती सुधारली नसल्याची माहिती आहे, त्यांना ताप, सर्दी, घशाला संसर्ग झाल्याची माहिती आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे त्यांना कोणालाही भेटण्यास मनाई केली आहे. त्याचबरोबर शिंदे भेटी टाळत असल्याच्या चर्चांसोबत ते नाराज असल्याच्या देखील चर्चा होत्या. त्यानंतर त्यांनी दरे गावात माध्यमांशी संवाद साधत सर्व चर्चांवर आपलं मत स्पष्ट केलं. तर अजित पवार (Ajit Pawar) दिल्लीत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षातील नेत्यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्रिपदाबरोबरच इतर पदांसाठीची रस्सीखेच

राज्यात महायुतीचे सरकार मोठ्या संख्येने निवडून आलं तरी राज्यातील मुख्यमंत्रिपदाबरोबरच इतर पदांसाठीची रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आजारी पडल्याने त्यांच्या पक्षातील आमदारांसोबतच्या चर्चा सध्या होत नसल्याचं चित्र आहे. सोमवारी आमदार विजय शिवतारे आणि अर्जुन खोपकरदेखील ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते. परंतु, डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला असल्याने दोघांचीही भेट झालेली नाही. ते परत गेले. शिंदेंना (Eknath Shinde) भेटण्यासाठी पक्षातील अनेक आमदारांनी प्रयत्न सुरू केले. मात्र, त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. त्यामुळे आता काही नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्याचा आसरा घेतला आहे.

सागर बंगला बंगला इच्छुक आमदारांसाठी बनला आसरा 

राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी भाजप श्रेष्ठींनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे, तर उद्या (बुधवारी) भाजप आमदारांच्या बैठकीत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. गुरुवारी नव्या सरकारचा मुख्यमंत्रीपदाचा आणि इतर मंत्र्याच्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मंत्रिमंडळातील संभाव्य नावांची चर्चाही सुरू झाली आहे. मंत्रिमंडळात काही जुन्या चेहऱ्यांना डच्चू देऊन नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे ज्येष्ठांसह मंत्रिपदासाठी इच्छुक नव्या उमेदवारांनी हालचाली सुरू केल्या आहेत. काही आमदारांनी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे धाव घेतली आहे. काल(सोमवारी) अनेक नेत्यांनी सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती आहे. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल आझाद मैदान येथे होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या तयारी ठिकाणी जावून पाहणी केली. त्यानंतर ते सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले. महायुती सरकारमध्ये मंत्री राहिलेले चंद्रकांत पाटील, अतुल सावे, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, यांच्यासह मावळते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ, नारायण कुचे, प्रतापराव चिखलीकर, चित्रा वाघ, संजय कुटे, राहुल कुल, रणजित सावरकर, राणा जगजितसिंह पाटील, मेघना बोर्डीकर, अनिल बोंडे, मुरजी पटेल त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे, मोहित कंबोज, या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी देखील काल (सोमवारी) देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. म्हात्रे यांच्या भेटीने चर्चा सुरू झाल्या आहे. 

आणखी वाचा - Ajit Pawar: शिवसेनेला मिळणार तितकीच मंत्रीपद राष्ट्रवादीला मिळण्याची मागणी; अजित पवारांच्या दिल्लीवारीचं कारण आलं समोर, वाचा एबीपी माझाचा रिपोर्ट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News:  नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
कोल्हापूर : नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे,धनुष्यबाणाचे बटन दाबायचे; आमदार सत्तारांचे मतदारांना आवाहन
पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे,धनुष्यबाणाचे बटन दाबायचे; आमदार सत्तारांचे मतदारांना आवाहन
Devendra Fadnavis : मी कोणावरही टीका करत नाही, आमच्याकडे नीती, नियती आहे अन् निधी देखील आहे; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य; राज्याच्या तिजोरीबाबत पुनर्उच्चार?
मी कोणावरही टीका करत नाही, आमच्याकडे नीती, नियती आहे अन् निधी देखील आहे; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य; राज्याच्या तिजोरीबाबत पुनर्उच्चार?
Accident: भरधाव डंपर खडीसकट कारवर कोसळला; 4 वर्षाच्या चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील 7 जणांचा अंत, काकाच्या अत्यसंस्काराला जाताना अवघं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त
भरधाव डंपर खडीसकट कारवर कोसळला; 4 वर्षाच्या चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील 7 जणांचा अंत, काकाच्या अत्यसंस्काराला जाताना अवघं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
Top 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट 29 नोव्हेंबर 2025
Sayaji Shinde Nashik Tapovan Tree Cutting : एकही झाड तुटू देणार नाही, झाडं तोडल्यास माफी नाही
Sharad Pawar on Congress :  मुंबई पालिकेसाठी काँग्रेसचा 'स्वबळाचा' नारा: महाविकास आघाडीत तणाव! उद्धव ठाकरे, शरद पवारांकडून नाराजी व्यक्त
chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News:  नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
कोल्हापूर : नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे,धनुष्यबाणाचे बटन दाबायचे; आमदार सत्तारांचे मतदारांना आवाहन
पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे,धनुष्यबाणाचे बटन दाबायचे; आमदार सत्तारांचे मतदारांना आवाहन
Devendra Fadnavis : मी कोणावरही टीका करत नाही, आमच्याकडे नीती, नियती आहे अन् निधी देखील आहे; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य; राज्याच्या तिजोरीबाबत पुनर्उच्चार?
मी कोणावरही टीका करत नाही, आमच्याकडे नीती, नियती आहे अन् निधी देखील आहे; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य; राज्याच्या तिजोरीबाबत पुनर्उच्चार?
Accident: भरधाव डंपर खडीसकट कारवर कोसळला; 4 वर्षाच्या चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील 7 जणांचा अंत, काकाच्या अत्यसंस्काराला जाताना अवघं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त
भरधाव डंपर खडीसकट कारवर कोसळला; 4 वर्षाच्या चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील 7 जणांचा अंत, काकाच्या अत्यसंस्काराला जाताना अवघं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त
Kolhapur News: मुरगुडला राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या दारात दोन पत्रावळीत लिंबू, नारळ, हळद टाकत भानामती!
मुरगुडला राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या दारात दोन पत्रावळीत लिंबू, नारळ, हळद टाकत भानामती!
Sujay Vikhe Patil: शिर्डीतील साईबाबांच्या प्रसादाबाबत सुजय विखे-पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य, पुन्हा वादाला तोंड फोडलं, म्हणाले...
शिर्डीतील साईबाबांच्या प्रसादाबाबत सुजय विखे-पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य, पुन्हा वादाला तोंड फोडलं, म्हणाले...
Nilesh Rane Vs BJP: गुन्हा दाखल होताच निलेश राणे संतापले, रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, म्हणाले, 'गुन्हा दाखल करून माझ्यासारखा माणूस डगमगणार नाही'
गुन्हा दाखल होताच निलेश राणे संतापले, रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, म्हणाले, 'गुन्हा दाखल करून माझ्यासारखा माणूस डगमगणार नाही'
लग्न पुढे ढकलल्याच्या उलट सुलट चर्चा; स्मृती मानधनासह  पलाशनीही इंस्टाग्राम बायो केला अपडेट, चर्चांना उधाण
लग्न पुढे ढकलल्याच्या उलट सुलट चर्चा; स्मृती मानधनासह पलाशनीही इंस्टाग्राम बायो केला अपडेट, चर्चांना उधाण
Embed widget