एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Markadwadi Village एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंगची पक्रिया रद्द

Markadwadi Village in Solapur: मारकडवाडी गावातील मतपत्रिकेद्वारे घेण्यात येणारे मतदान रद्द करण्यात आले आहे. पोलिसांची कठोर भूमिका.

सोलापूर:  बॅलेटसाठी आम्ही छातीवर बुलेट झेलू, असा निर्धार व्यक्त करत मारकडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा निर्णय अखेर ग्रामस्थांकडून मागे घेण्यात आला आहे. मारकवाडीतील बॅलेट पेपरद्वारे होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सोमवारी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही मारकडवाडी गावातील (Markadwadi Village) ग्रामस्थ मतदानप्रक्रिया राबवण्यावर ठाम होते. त्यानुसार आज सकाळी मारकडवाडी ग्रामपंचायतीबाहेर नागरिकांची जमवाजमव सुरु झाली होती. मात्र, पोलिसांनी दिलेल्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करुन येथील बॅलेट पेपर व्होटिंगची (Ballot Paper Voting) पक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. यानंतर उत्तमराव जानकर (Uttam Jankar) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

आम्ही पोलिसांसोबत बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्यासाठी चर्चा केली.  त्यांनी सांगितलं की, तुम्ही एक मतदान केलं तर आम्ही मतपत्रिका आणि इतर साहित्य जप्त करु. आम्ही अगोदरच 144 कलम लागू केले आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांवर गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी उत्तमराव जानकर यांना सांगितले. यानंतर आपण ग्रामस्थांशी चर्चा केल्याचे उत्तमराव जानकर यांनी सांगितले. जर पोलीस मतदान करुन देणार नसतील तर काय फायदा? आपण पेट्या धरुन ठेवणार, ते हिसकावणार, त्यामुळे गोंधळ होऊन झटापट उडेल. यामध्ये मतदानासाठी आलेले लोक निघून जातील, असे ग्रामस्थांचे म्हणणे पडले. त्यामुळे तुर्तास आम्ही ही मतदानप्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे उत्तमराव जानकर यांनी सांगितले. 

मारकडवाडी गावात 1500 च्या आसपास मतदान झाल्याशिवाय निकाल येणार नाही. या गावात मला मतदान होणार होते. मात्र, आता पोलीस बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याला विरोध करत आहेत. आता आम्ही मोर्चा काढून हा मुद्दा प्रांताधिकारी आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवू. पण हा उत्तमराव जानकर न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही, असे जानकर यांनी म्हटले. माझ्या अभ्यासानुसार मला या गावात 1400 आणि समोरच्याला 502 इतकी मतं पडली. पण निकालावेळी समोरच्या उमेदवाराला मारकडवाडीतून 1003 मतं पडल्याचे समोर आले. समोरच्या उमेदवाराला दुप्पट मतदान झाले, असा आरोप जानकर यांनी केला.

आणखी वाचा

ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीसांविरुद्धच्या एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यांमागे दिलीतील महाशक्ती; संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली
फडणवीसांविरुद्धच्या एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यांमागे दिलीतील महाशक्ती; संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली
Markadwadi Village एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंगची पक्रिया रद्द
एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंगची पक्रिया रद्द
काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMarkarwadi Ballot Polling  : मारलं तरी मतदान करू; मारकडवाडीतील ग्रामस्थांची भूमिकाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 3 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फडणवीसांविरुद्धच्या एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यांमागे दिलीतील महाशक्ती; संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली
फडणवीसांविरुद्धच्या एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यांमागे दिलीतील महाशक्ती; संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली
Markadwadi Village एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंगची पक्रिया रद्द
एक मत पडलं तरी... पोलिसांची फायनल वॉर्निंग अन् मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंगची पक्रिया रद्द
काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
काँग्रेसची धुसफूस आली हमरीतुमरीवर! बंटी शेळके नाना पटोले वादात पदाधिकारीच उतरले मैदानात
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
Avinash Jadhav Resignation: राज ठाकरेंनी एक फोन फिरवला अन् अविनाश जाधवांना पुन्हा कामाला लावलं, म्हणाले....
राज ठाकरेंनी एक फोन फिरवला अन् अविनाश जाधवांना पुन्हा कामाला लावलं, म्हणाले....
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Embed widget