एक्स्प्लोर

पालघरच्या वाढवण बंदराला मच्छिमारांचा विरोध, 15 डिसेंबरला मुंबई ते झाईपर्यंतच्या कोळीवाड्यांची बंदची हाक

पालघरच्या वाढवण बंदराला मच्छिमारांचा विरोध वाढला आहे. मात्र स्थानिक मच्छिमारांना का नको आहे बंदर?

पालघर : केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदर संदर्भात हालचालींना वेग आला असून वाढवण परिसरातील नागरिकांनी समुद्र जवळ जाऊन एकत्र येत सरकारविरोधात आणि जेएनपीटी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे वरिष्ठ वैज्ञानिक राकेश पी एस यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी वाढवण परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर जैव विविधते बाबत सर्वेक्षण करण्यासाठी अधिकारी आले होते. मात्र स्थानिकांचा तीव्र विरोध असताना देखील केंद्र सरकारकडून वाढवण बंदर उभारण्याच्या हालचाली सुरूच असल्याने स्थानिक अधिक आक्रमक झाले होते. परिसरातील,महिला मुलाबाळांसह नागरिक , तरुण रस्त्यावर उतरले होते,,मात्र अजूनही ह्या हालचालींना वेग आला असून या विरोधात 15 डिसेंबरला मुंबईच्या कफ परेड पासून डहाणूच्या झाई पर्यंतच्या कोळीवाड्यांची बंदची हाक दिली असून या दिवशी किनारपट्टीवरील सर्व गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.

काय आहेत वाढवण बंदराचे फायदे तोटे

  1. समुद्रात सुमारे साडेपाच हजार एकरावर केला जाणार आहे भराव.
  2. सुमारे साडेबारा किलोमीटर पर्यंत प्रवाह अडवणारी ब्रेक वॉटर बांधली जाणार आहे.
  3. या प्रकल्पामुळे 47 गावे आणि 261 पाडे प्रकल्प बाधित होणार आहेत.
  4. तारापूर अणुशक्ती केंद्रापासून अवघ्या सहा किलोमीटर मध्ये हा हा प्रकल्प उभा राहत आहे.
  5. समुद्रात भराव केल्यामुळे तारापूर अणुशक्ती केंद्रामध्ये शिरू शकते पाणी.
  6. प्रचंड मोठ्या प्रमाणावर कोळसा खनिज तेल यांची आयात करण्यासाठी हा प्रकल्प प्रस्तावित आहे.
  7. डहाणू पट्ट्यातील डोंगर टेकड्या भराव करण्यासाठी तोडल्या जाणार.
  8. सदर प्रकल्पामुळे मच्छिमार डाय मेकर आदिवासी शेतकरी या समाजांच्या उपजीविकेवर पडणार आहे कुऱ्हाड.
  9. पालघर जिल्ह्यातील सागरी जैवविविधतेने भरभरून दिलेले ठिकाण होणार आहे उध्वस्त.
  10. प्रवाळ खडकांची रांग, मृदुकाय प्रवाळ, तारा मासे, स्पोंज, समुद्री पानघोडे आणि पालघर जिल्ह्यातील गोड माशाचे एकमेव नैसर्गिक प्रजनन केंद्र नष्ट होणार.
  11. सर्वसामान्यांना उद्ध्वस्त करून कुठला विकास साधला जाणार आहे असा संतप्त सवाल गावकरी विचारत आहेत.
  12. वीस वर्षांपूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयाने नाकारली होती परवानगी.
  13. येथील जैवविविधतेच्या मुळे तालुका पर्यावरणीय दृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला.
  14. येथील पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने धर्माधिकारी कमिटीची स्थापना करून डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाची ची निर्मिती केली होती.
  15. बंदर प्रकल्प रेटून नेण्यासाठी जुनी पर्यावरण संरक्षण समिती बरखास्त करून नवीन समिती निर्माण करण्यात आली.
  16. जुनी समिती बरखास्त होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयात प्रकरण दाखवला असता ना बेकायदेशीररीत्या हंगामी समिती बनविण्यात आली.
  17. प्रकल्प झाल्यास खूप मोठ्या प्रमाणावर कोळसा खनिज तेल इत्यादींची वाहतूक डहाणू मधून होणार आहे.
  18. पालघर बोईसर मधील एमआयडीसीचा विस्तार वाढवला जाईल.

इंग्लंड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र’ या कार्यक्रमात वाढवण बंदराची प्रथम घोषणा करण्यात आली होती. 1996 ते 1998 दरम्यान या बंदराला स्थानिक पातळीवर विविध प्रकारे विरोध झाला होता. बंदराला विरोध करण्यासाठी धरणे, उपोषण, मोर्चे आणि इतर आंदोलने करण्यात आली होती आणि प्रकल्पाला विरोध करणाऱ्या 126 जणांना अटक झाली होती.

या बंदराला विरोध करणाऱ्या नागरिकांनी ‘वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती’च्या माध्यमातून प्रकल्पाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाकडे वर्ग केली असता सुनावणीदरम्यान सर्व संबंधितांची बाजू ऐकून 1998 मध्ये पाच आदेश पारित केले होते. या आदेशांमुळे वाढवण बंदराची उभारणी करणे कठीण होणार होते. दरम्यान, विधानसभेवरील मोर्चा आणि इतर आंदोलनांची दाखल घेऊन त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढवण येथे पाठवून स्थानिक जनतेचे मत जाणून घेतल्यानंतर राज्य सरकारने हा बंदर प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला.

1998 ते 2014 दरम्यान या प्रकल्पाविषयी परिस्थिती ‘जैसे थे’ राहिली होती. 2014  मध्ये केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर या बंदराच्या उभारणीच्या हालचालीला पुन्हा सुरुवात झाली. या प्रकल्पाच्या अनुषंगाने 2015-16 दरम्यान सर्वेक्षण हाती घेण्यात आले होते. त्या वेळी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीने पुन्हा डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण यांच्याकडे अपील अर्ज केला असता न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 11 तज्ज्ञांचा समावेश असलेल्या प्राधिकरणाने सुनावणी घेऊन 1998 मध्ये पारित केलेले पाचही आदेश कायम ठेवले. प्राधिकरणाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली गेली नसल्याने या बंदराची उभारणी अशक्य होती.

दरम्यान, प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे 2019 मध्ये निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नव्याने नेमणूक करण्यात आली नाही. त्यापलीकडे जाऊन केंद्र सरकारने डहाणू प्राधिकरण विसर्जित करून या परिसरातील पर्यावरण रक्षणाची जबाबदारी अन्य शासकीय प्राधिकरणाकडे सोपवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. याविरोधात वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती आणि अन्य संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केली असून ही बाब न्यायप्रविष्ट आहे.

स्थानिकांना विश्वासात घेतले नाही’ केंद्र सरकारने या प्रकल्पाला मंजुरी देताना स्थानिकांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करण्यात येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती किंवा परवानगी नसताना वाढवण बंदर उभारण्याला केंद्र शासनाच्या मंत्रिमंडळाने मंजुरी देणे ही लोकशाहीची गळचेपी असल्याचे वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील, सरचिटणीस अशोक अंभिरे, सचिव वैभव वझे यांनी सांगितले. ही बाब न्यायप्रविष्ट असताना केंद्र सरकारने

वाढवण बंदराला मंजुरी देऊन न्यायालयाचा अवमान केला आहे. केंद्र शासनाने कायद्याचे उल्लंघन व अनादर केल्याने या निर्णयाविरोधात संघर्ष समिती सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. प्रस्तावित बंदरविरोधात पुन्हा विविध पातळीवर आंदोलने छेडण्यात येतील तसेच केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरुद्ध आवाज उठवण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

शिवसेनेची भूमिका महत्त्वाची

वाढवण बंदराबाबत शिवसेना पक्ष स्थानिक जनतेसोबत राहील, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचारादरम्यान जाहीर केले होते. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असून त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. केंद्र सरकार बुलेट ट्रेन प्रकल्पापाठोपाठ वाढवण बंदर प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करीत असताना या दोन्ही प्रकल्पांबाबत शिवसेनेची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

डहाणू तालुक्यात हे बंदर झाले तर आयात आणि निर्यात यांना खूप मोट्या प्रमाणात चालना मिळणार असून 90% कंटेनरची वाहतूक ही वाढवण बंदरातून होणार आहे. या बंदराच्या माध्यमातून आयात होणार कंटेनर हे देश भारातत वितरित केले जाणार आहेत.

वाढवण बंदराला तत्त्वतः मंजुरी दिली सूनही येथील स्थानिकांचा ह्या बंदराला विरोध कायम आहे. गेली 18 वर्षे स्थानिक मच्चीमार ,भूमिपुत्र आणि बागायतदार  वाढवण बंदर संघर्ष समितीच्या माध्यमातून वाढवण बंदर रद्द करावे यासाठी सतत लढा देत आहे. वाढवण बंदरामुळे आयात निर्यातीला चालना मिळते असली तरी ह्या भागातील मच्चीमार सरकारी फळ बागायतदार लघु लघुउद्योजक लागणार असल्याने स्थानिकांच्या ह्या बंदराला तीव्र विरोध आहे.

पालघर जिल्ह्यातील प्रास्ताविक वाढवण बंदराला विरोध म्हणून पालघर विधानसभा आणि डहाणू विधानसभा क्षेत्रातील जवळपास परिसरातील 15 गावांनी निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला होता.

केंद्र सरकारच्या होऊ घातलेल्या वाढवण बंदराला विरोध म्हणून पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी लगत असलेल्या वाढवण सह इतर 15 गावांनी निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला होता. अनेक वर्षांपासून मागणी करूनही सरकार  वाढवण बंदर रद्द करत नसल्याने अखेर स्थानिक नागरिकांनी आक्रमक होत मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे वाढवण सह वरोर , धाकटी डहाणू , टीगरे पाडा , गुंगवाडा सह परिसरातील मतदान केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिलाला होता . या भागात जवळपास 10 ते 12 हजार मतदार होते .

बहिष्कार टाकल्याने प्रशासन तसेच राजकीय पक्षांचे डोकेदुखी वाढली होती वाढवण हे समृद्ध, सधन भाग, भातशेती म्हणजेच समुद्र शेती - बागायती जागतिक मागणी पिढन्पिढ्या सुखाने नांदत आहेत.  परंतु विनाशकारी बंदर मुले येथील स्थानिकांचे , मच्छिमारांचे  , शेतकऱ्याचे मोठे नुकसान होणार मासाची मोठी पैदास उपासमारीची वेळ येणार  आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओBhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
K P Patil : 'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
Embed widget